Political News Saam Tv
मुंबई/पुणे

प्रकाश पाटील, वामन म्हात्रेंची कालच शिवसेनेकडून हकालपट्टी अन् काही तासांतच CM शिंदेंकडून मोठे 'गिफ्ट'

रात्री 3 वाजता त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री 3 वाजता त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले.

प्रकाश पाटील हे गेली 12 वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या संघटन कौश्यल्याचा नक्कीच पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हे देखील पाहा -

यांच्यासह बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची देखील बदलापूर शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बदलापूर अंबरनाथ परिसरात शिवसेनेला अधिक बळ देण्यासाठी नक्कीच होईल अशी अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.

वामन म्हात्रेंची कालच शिवसेनेकडून हकालपट्टी

शिवसेनेचे बदलापूर (Badlapur) शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत वामन म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे आशी घोषणा आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर वामन म्हात्रे यांनी बदलापूरमधील सर्वच्या सर्व नगरसेवकांना घेऊन शिंदे गटाला पाठींबा दिला होता. म्हात्रे यांना शिवसेनेनं नगराध्यक्षपद दिलं होतं. तर एकदा विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी मनसेतही प्रवेश केला होता.

मात्र काही दिवसातच ते स्वगृही परतले होते. दरम्यान, वामन म्हात्रे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शिंदे गटात गेलेले इतर पदाधिकारी आणि नगरसेवक 'सामना'त नाव येण्याच्या भीतीनं चांगलेच धास्तावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT