Prakash Ambedkar Sharad Pawar Meet  SaaM TV
मुंबई/पुणे

Political News: मविआत होणार 'वंचित'ची एंट्री? शरद पवार यांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर...

Prakash Ambedkar Sharad Pawar Meet : मविआत होणार 'वंचित'ची एंट्री? शरद पवार यांच्या भेटीनंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

साम टिव्ही ब्युरो

Prakash Ambedkar Sharad Pawar Meet :

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय वैर सर्वांना परिचित आहे. पवारांवर टीका करायची एकही संधी प्रकाश आंबेडकर सोडत नाही. पण दोन्ही नेत्यांची गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा भेट झालीय. एप्रिल महिन्यात कर्नाटक निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. आज परत पवार आंबेडकर भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय.

भाजपविरोधात इंडिया आघाडीच्या नावाखाली भाजपविरोधी पक्ष एकत्र आलेत. त्यात आणखी काही पक्षांची भर पडणार आहे. आंबेडकर यांची वंचित आघाडी इंडियात सहभागी होणार की. नाही. हे स्पष्ट नसलं तरी इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाबरोबर युती करण्याची आंबेडकर यांनी घोषणा केलीय. ही युती कुठल्या निवडणुकीसाठी आहे? हे स्पष्ट नसलं तरी आंबेडकर इंडिया आघाडीत आलेतर मतांमध्ये मोठी भर पडू शकते. पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार यांचं राजकारण मराठा केंद्रीत आहे. तर प्रकाश आंबेडकर दलित मतांबरोबर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगात असतात. गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीनं एमआयएमबरोबर आघाडी करुन मोठ्या प्रमाणात मतं खेचली होती. त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला झाला होता. (Latest Marathi News)

तर भाजपला फायदा झाला होता. आता एमआयएमबरोबर आंबेडकर यांनी फारकत घेतली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळीक केलीय. त्यामुळं त्यांचा राजकीय फायदा उचलण्याचा‌ प्रयत्न इंडिया आघाडीकडून केला जाण्याची शक्यता आहे. तूर्तास‌ तरी याबाबत इंडिया आघाडीचे नेते‌ बोलत‌ नाहीत.

पश्चिम विदर्भात आंबेडकर हे काही प्रमाणात यशस्वी झालेत. तिथं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये आंबेडकरांचे प्रतिनिधी निवडून आलेले दिसतात. पण राज्याच्या इतर भागात दलित‌ मतांसाठी आंबेडकर आपल्या ठरू शकतात. त्यामुळं देश पातळीवर भाजपविरोधात लढण्यासाठी आंबेडकर इंडिया आघाडीला हवे आहे. त्याचसाठी या भेटीगाठी होत असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT