पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल (एन) पक्षाचे संस्थापक नवाझ शरीफ हे तब्बल चार वर्षानंतर पाकिस्तानात परतत आहेत. शरीफ 2019 पासून देशाबाहेर लंडनमध्ये होते. गुरुवारी स्थानिक न्यायालयाने नवाझ शरीफ यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाझ शरीफ शनिवारी लाहोरला पोहोचू शकतात. नवाझ शरीफ यांना 2018 मध्ये कोर्टाने निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित करून तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना लंडनला उपचारासाठी जाण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली. तेव्हापासून नवाझ शरीफ पाकिस्तानच्या बाहेर आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नवाझ शरीफ यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांमुळे त्यांना पाकिस्तानात परत येताच तुरुंगात जाण्याचा धोका होता. गुरुवारी एका अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने नवाजच्या अटकेला २४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. त्यानंतर त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएलएनचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी येण्याची शक्यता आहे. नवाझ शरीफ यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कार्यकर्त्यांना नवाझ शरीफ यांचे जंगी स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)
कोण आहेत नवाझ शरीफ?
शरीफ यांनी 1976 मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षात प्रवेश करून राजकारणाला सुरुवात केली. 1981 मध्ये ते पंजाबचे अर्थमंत्री झाले. 1985 मध्ये शरीफ पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यानंतर त्यांचे पीएमएलसोबतचे संबंध बिघडले आणि त्यांनी स्वत:चा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) स्थापन केला.
1990 मध्ये नवाझ शरीफ पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. 1997 मध्ये नवाझ शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी आणि भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांच्या कार्यकाळात चर्चा झाली. मात्र, भारताशी चांगले संबंध ठेवण्याच्या बाजूने दिसणाऱ्या नवाझ यांच्या कार्यकाळात कारगिलही घडले, त्यात पाकिस्तानच्या पराभवाने नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढल्या.
परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना पदच्युत करून सत्ता काबीज केली. 2013 मध्ये शरीफ तिसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. पनामा पेपर्स लीक प्रकरण एप्रिल 2016 मध्ये समोर आले होते. यामध्ये शरीफ कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर नवाझ शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आणि पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदच गमवावे लागले नाही तर त्यांना ४ वर्षे लंडनमध्ये काढावी लागली.
परवेझ मुशर्रफ यांनी त्यांचा पराभव केला आणि सत्ता काबीज केली. 2013 मध्ये शरीफ तिसर्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. पनामा पेपर्स लीक प्रकरण एप्रिल 2016 मध्ये समोर आले होते. यामध्ये शरीफ कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर नवाझ शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आणि पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदच गमवावे लागले. यानंतर त्यांनी 4 वर्षे लंडनमध्ये काढली. आता ते पुन्हा पाकिस्तानात परतत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.