Prakash Ambedkar on Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Prakash Ambedkar: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Prakash Ambedkar Latest News: उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या नालायकपणामुळे भाजप सत्तेत आलं, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Satish Daud

Prakash Ambedkar on Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसच्या नालायकपणामुळे भाजप सत्तेत आलं, अशी टीकाही त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकाळ वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी राजकीय प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील वंचितच्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. ते स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी वंचितचे जवळपास ३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. तर काही जागांवर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देखील दिला आहे. यावरुन तुम्ही विशिष्ट ठिकाणीच पाठिंबा देताय असं का? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्याचं कारण असं आहे की, ते नाहीच येत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट स्वतंत्र राहिल आणि भाजपसोबत जाणार नाही याची काहीच गॅरंटी नाही, असं आंबेडकर म्हणाले. त्याचं कारण असं आहे की, शिवसेनेचा इतिहास आहे की ते भाजपचा भाग राहिले आहेत".

२०१४ मध्ये राष्ट्रवादीने न मागता भाजपला पाठिंबा दिला होता, अशी आठवण देखील प्रकाश आंबेडकर यांनी करुन दिली. दरम्यान, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचा बऱ्याच जागांवर पराभव झाला. वंचित ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून होत होता.

यावर प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, "काँग्रेस आणि भाजप दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसवाल्यांच्या नालायकपणामुळेच भाजप सत्तेत आलं. आता हेच काँग्रेस आम्हाला सांगत आहे, की भाजपला थांबवण्यासाठी तुम्ही आम्हालाच मदत करा".

"तुम्ही निवडणूक लढवू नका ही कुठली लोकशाही? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तुम्ही स्ट्रगल करुन विजय मिळवा, तुम्ही पार्टीच्या जोरावर आपली पार्टी वाढण्याचा प्रयत्न करत आहात", असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला चांगलंच सुनावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT