Prakash Ambedkar On Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : शिवसेनेत बंडखोरी झाली असताना प्रकाश आंबेडकरांना वेगळीच शंका

Political Crisis In Maharashtra : एकनाथ शिंदे गट भाजसोबत युती करुन सत्तेत येणार? की एकनाथ शिंदे आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार? की मविआला सरकार वाचवण्यात यश येणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री नगरविकास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बंडाची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. शिंदे यांच्यासह ३३ आमदार गुवाहटीत गेले असल्याची माहिती आहे, यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आज आणखी दोन आमदार गुवाहटीसाठी निघाले आहेत. सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष भाजपही अजूनही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र या सगळ्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?" असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. सध्या त्यांचं ट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे. (Prakash Ambedkar On Eknath Shinde)

हे देखील पाहा -

शिवसेनेत बंडखोरी झाली असताना प्रकाश आंबेडकरांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात आणि महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केली. यानंतर आता ते भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आज ते मविआचा पाठिंबाही काढून घेणार असल्याचं बोललं जातंयं. या सगळ्यात भाजप अजूनही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. मात्र "भाजपने सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलीन झाल्यावरच सरकार स्थापन करु" अशी अट घातली आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केली आहे. भाजपने किंवा एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्यापतरी कोणतंही जाहीर भाष्य केलेलं नाही. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या शंकेला वाव असल्याचं अनेकजण दबक्या आवाजात सांगतात.

दुसरीकजे बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाने मविआचा पाठींबा काढल्याशिवाय भाजप गडबड करणार नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. आज एकनाथ शिंदे गट मविआ सरकारसोबत पाठींबा काढत असल्याचे पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. असं झाल्यानंतरच भाजप पुढच्या हालचाली करणार आहे. मागची चूक पुन्हा होऊ नये म्हणून यावेळी सर्व गोष्टी योग्य त्या पद्धतीने पार पडल्यावरच भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचालींना सुरवात करण्यात येणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह ३३ आमदार गुवाहटीत गेले असल्याची माहिती आहे, यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढत आहे. आज आणखी दोन आमदार गुवाहटीसाठी निघाले आहेत.

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सारवणकर गुवाहाटीसाठी निघाले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील आमदारांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळत आहे. आता एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार झाले आहेत, तर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे संख्याबळापेक्षाही जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. या सगळ्यात भाजप मात्र वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्वात जास्त आमदार असूनही भाजपला ८० तासांच सत्तेतून बाहेर व्हावं लागलं होतं, तसं आता काही होऊ नये म्हणून भाजप सावधगिरीने पावलं उचलत आहे.

प्रकाश आंबेडकरांची शंका खरी ठरली तर?

"भाजपने सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलीन झाल्यावरच सरकार स्थापन करु" अशी अट घातली आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केली आहे. याबाबत भाजपने किंवा एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्यापतरी कोणतंही जाहीर भाष्य केलेलं नाही. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेली शंका ठरली तर काय होऊ शकतं यावर राजकीय विश्लेषकांमध्येही अनेक मतभेद आहेत. एकनाथ शिंदे गट भाजसोबत युती करुन सत्तेत येणार? की एकनाथ शिंदे आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार? की मविआला सरकार वाचवण्यात यश येणार? हे येणाऱ्या काळातच कळेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: श्रीवर्धनमधून आदिती तटकरे विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT