Prakash Ambedkar
Prakash Ambedkar  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: महाविकास आघाडीत ट्विस्ट, प्रकाश आंबेडकर सोबत येणार? २ एप्रिलला भूमिका स्पष्ट करणार

Vishal Gangurde

Prakash Ambekdar News :

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार की नाही, याविषयी अॅड. प्रकाश आंबेडकर भूमिका स्पष्ट करणार आहेत. 'लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपविरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्देवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. त्यामुळे विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार अॅड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

महाविकास आघाडीविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'महाविकास आघाडी वेगळी आहे. तर संजय राऊत वेगळे आहेत. आम्ही ज्यांना लक्ष्य केलं, ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात. त्यामुळे आम्ही म्हणालो की, संजय राऊत हे आघाडीत बिघाडी करत आहेत'.

आघाडीकडून तीन जागांच्या पलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही - प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीच्या प्रस्ताविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आम्हाला महाविकास आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात अकोला लोकसभा मतदारसंघ होता. तर दोन दुसऱ्या जागा होत्या. यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही'.

कंत्राटी व्यवस्थेवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

आंबेडकर म्हणाले, 'कंत्राटी व्यवस्थेत जो कर्मचारी आणि अधिकारी राबलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघितला तर लक्षात येईल की, त्यांना ५८ व्या वयापर्यंत निवृत्त करायचे नाही असा अजेंडा आमचा ठरत आहे. राज्यात १४ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केली पाहिजे. पाच वर्षात ही संख्या २२ लाखांवर गेली पाहिजे. तेव्हाच शासन व्यवस्थितरित्या चालू शकते'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या १९ वर्षीय इंजीनिअरिंग विद्यार्थिनीचा पर्दाफाश, सापडला लाखोंचा ऐवज

Home Remedies for Bad Breath: तोंडाची दुर्गंधी ५ मिनिटांत दूर होईल; फॉलो करा 'या' ५ टिप्स

Retirement Investment: वयाच्या ३० व्या वर्षी करा NPS योजनेत गुंतवणूक, निवृत्तीनंतरही व्हाल मालामाल

Ahmednagar News : पारनेरमध्ये लंके-विखेंचे कार्यकर्ते भिडले, पैसै वाटल्याचा आरोप

LIC Policy: रोज ४५ रुपये जमा करा अन् २५ लाख मिळवा; एलआयसीच्या या योजनेत मिळतोय भरघोस फायदा

SCROLL FOR NEXT