praful patel News  Saam tv
मुंबई/पुणे

Praful Patel News : शरद पवार भाजपसोबत येण्यासाठी ५० टक्के तयार होते; प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांकडून दुजोरा

praful patel Latest News : प्रफुल्ल पटेल यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे ५० टक्के अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार होते. शपथविधीनंतर त्यांच्यासोबत येण्यास तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

Vishal Gangurde

Praful Patel on Sharad Pawar :

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. शरद पवार हे ५० टक्के अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार होते. शपथविधीनंतर त्यांच्यासोबत येण्यास तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे.

अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार पक्षातून बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या भूमिकेने पक्षात दुफळी निर्माण झाली. अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हातमिळवणी केल्यानंतर शपथविधीनंतर शरद पवार देखील ५० टक्के सोबत येण्यास तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

प्रफुल्ल पटेल पटेल नेमकं काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'आम्ही त्यांना भाजपसोबत येण्याची विनंती केली होती. आम्ही अनेक प्रयत्न केले होते. तुम्हीही पाहिलं असेल, पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतरची ही गोष्ट आहे. त्यानंतर मुंबईच्या बैठकीनंतर स्पष्ट दिसत होतं की, आमचं त्यांच्याशी बोलणं सुरु होतं. शरद पवार देखील ५० टक्के भाजपसोबत येण्यास तयार होते'.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. 'लोकसभा निवडणुकीदरम्यान या गोष्टीवर काही भाष्य करू इच्छित नाही. पण एवढं बोलतो की, प्रफुल्ल पटेल हे काही खोटे बोलत नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

SCROLL FOR NEXT