प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सूरज सावंत
मुंबई/पुणे

प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूरज सावंत

मुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरन Mansukh Hiren हत्याकांड प्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा Pradip Sharma यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे कारण प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुवणली आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबत संतोष शेलार Santosh Shelar, आनंद जाधव Anand Jadhav यांना देखील १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रदीप शर्मा यांची काही दिवसांआधी एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्मा यांनी वकिलास भेटण्याची परवानगी मागितली असता त्यांना कोर्टाकडून दिलासा देण्यात आला होता. पण त्यांनतर आता कोर्टाकडून त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून पुढील चौकशीमध्ये काय माहिती समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुरुवातीला मनसुख हत्येत प्रत्यक्ष सहभागप्रकरणी संतोष शेलार, आनंद जाधव या दोघांना लातूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली येथून प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण आता नाट्यमय वळणे घेत आहे. त्यात मनसुख हिरनची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

हे देखील पहा -

सचिन वाझे यांच्यासह गुन्हे शाखेतील त्यांच्या २ सहकाऱ्यांना अटक झाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. १८ जून रोजी याप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती आता प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने शर्मा यांना सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुवणली आहे. शर्मा हे हिरन हत्येप्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा संशय एनआयएला असून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT