Pradeep Purnekar Murder: CT Scan Report Reveals Bullet Injury Details saam tv
मुंबई/पुणे

Pradeep Purnekar:एक गोळी मानेच्या आरपार, एक छातीत अडकली; प्रदीप पुर्णेकरांचा CT स्कॅनचा रिपोर्ट आला समोर

Thane Shiv Sena UBT Leader Pradeep Purnekar Killed: ठाण्यात शिवसेना उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झालीय.पुर्णेकर यांचा CT स्कॅन रिपोर्टमधून समोर आला आहे.

Bharat Jadhav

  • ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

  • रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू झाला.

  • घटनेनंतर पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली.मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्याचा थरारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पुर्णेकर यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असं दिसत आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ एका मेडिकल दुकानाचा आहे. या व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर स्थानिक नागरिक प्रदीप पुर्णेकर यांना रुग्णालयात देताना दिसत आहेत.

एक गोळी मानेतून आरपार गेली

प्रदीप पूर्णकर यांचा सीटी स्कॅन रिपोर्ट समोर आलाय. यात धक्कादायक बाब उघड झालीय. पुर्णेकर यांच्यावर भयानक हल्ला करण्यात आला असून आरोपींनी त्यांच्यावर सातपैकी चार गोळ्या प्रदीप पुर्णेकर यांना लागल्या. एक गोळी त्यांच्या मानेतून आरपार गेली तर एक गोळी त्यांच्या छातीमध्ये अडकून राहिली होत, असं CT स्कॅन रिपोर्टमधून उघड झालंय. प्रदीप पूर्णकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं होते आणि या रिपोर्टमधून महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

ठाकरे गटाचे विभागप्रमुख असलेले प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नी विजेता पुर्णेकर आणि बंधू जयनाथ पुर्णेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच प्रदीप यांचे बंधू जयनाथ ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. माजी खासदार राजन विचारे यांचे निकटवर्तीय अशी प्रदीप पुर्णेकर यांची ओळख आहे.

प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात?

खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना या हत्याकांडाचा खरा सूत्रधार शिंदेसेनेत असल्याचा आरोप केलाय. याचसोबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद असल्याचे म्हणत राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.प्रदीप पुर्णेकरांनी निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.माजी महापौर मिनाक्षी शिंदेंसोबत त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता.बिल्डरांच्या माध्यमातून लोकांना बेघर करण्याचं काम तिथे सुरू होतं. मनोरमानगरमध्ये बिल्डरांना वसाहती निर्माण करायच्या होत्या. त्याविरोधात प्रदीप पूर्णेकर लढत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

Maharashtra News Live Update: FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव टाका- संजय राऊत

Sambhajinagar : मराठवाड्याचं 'महाबळेश्वर'! निसर्ग सौंदर्याने नटलंय 'हे' थंड हवेचं ठिकाण

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT