Pradeep Kurulkar Loptop DRDO Mistake Saam TV
मुंबई/पुणे

Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट; डीआरडीओकडून झाली मोठी चूक

Pradeep Kurulkar News: सध्या प्रदीप कुरुलकर यांची चौकशी सुरू असून या चौकशीत डीआरडीओकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pradeep Kurulkar News: पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) डीआरडीओ संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावलेली आहे. सध्या प्रदीप कुरुलकर यांची चौकशी सुरू असून या चौकशीत डीआरडीओकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

एटीएसने डीआरडीओकडे (DRDO) प्रदीप कुरुलकर यांचा लॅपटॉप तपासणीसाठी मागितला होता. त्यानंतर डीआरडीओने कुरुलकर यांचा लॅपटॉप एटीएसला दिला. मात्र, हा लॅपटॉप चुकीचा असल्याचं एटीएसने सांगितलं आहे. एटीएसने ही चूक डीआरडीओच्या लक्षात आणून दिली.

प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती.दरम्यान, तपासात कुरुलकरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस (ATS) न्यायालयाकडे केली.

न्यायालयाने एटीएसला कुरुलकर प्रकरणात पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणीतील फरक स्पष्ट करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे. कुरुलकर यांना पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविल्यानंतर त्यांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, या दृष्टीने तपास सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT