प्रबोधनकारांच्या पुस्तकावरुन वाद का पेटला?
पुस्तक वाटणाऱ्या कदमांचा आका कोण? असा सवाल उपस्थित केला.
राजेंद्र कदम यांनी नेमकं काय म्हटलंय?
कस्तुरबा रुग्णालयातील प्रबोधनकार ठाकरेंच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या पुस्तकाचा वाद आता चांगलाच पेटलाय.. या वादात आता थेट मनसेनं उडी घेत प्रबोधनकारांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय. दुसरीकडे ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी मात्र स्वातंत्र्यापुर्वीचं पुस्तक का वाटलं? एवढंच नाही तर पुस्तक वाटणाऱ्या कदमांचा आका कोण? असा सवाल उपस्थित केलाय. दुसरीकडे ठाकरेंनी मात्र प्रबोधनकारांच्या लेखणीचा गर्व असल्याचं म्हटलंय.. मात्र प्रबोधनकारांच्या पुस्तकावरुन वाद का पेटला? कस्तुरबा रुग्णालयात नेमकं काय घडलं? पाहा.
या वादानंतर साम टीव्ही पोहचली थेट पुस्तक वाटणाऱ्या राजेंद्र कदम यांच्याकडे. यावेळी राजेंद्र कदम यांनी नेमकं काय म्हटलंय? पाहा. प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदू धर्मातील रुढी परंपरांवर परखड भाष्य केलंय.. याच पुस्तकावरुन आता वादाचा भडका उडालाय.. मात्र हा वाद ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पेटला असताना प्रबोधनकारांचं पुस्तक वाटण्यामागे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा की हिंदूधर्माचा अपप्रचार करण्याचा हेतू आहे? असा सवाल विचारला जातोय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.