मुंबई/पुणे

Kalyan News : थकबाकी फक्त ₹9400; महावितरणनं सरकारी कार्यालयातीलच वीज कापली

प्रविण वाकचौरे

अभिजीत देशमुख

Kalyan News :

दोन महिन्यांचे वीज बिल थकवल्याने महावितरणने कल्याण पश्चिमेकडील चिकनघर येथील रजिस्ट्रेशन कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. शनिवारी रात्री महावितरणने ही कारवाई केली. सकाळच्या सुमारास रजिस्ट्रेशन कार्यालयातर्फे वीज बिल भरणा करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान हे रजिस्ट्रेशन कार्यालयात कल्याण डोंबिवली परिसरातील घरांचे जमिनीचे रजिस्ट्रेशन होते. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. शनिवार ते सोमवारी कार्यालय बंद होतं, त्यामुळे नागरिकांची ,कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही.

कल्याण पश्चिमेकडील चिकन घर येथील रजिस्ट्रेशन कार्यालयाचे ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून 9400 रूपये विज बिल थकीत होते. (Latest Marathi News)

महावितरण कार्यालयाकडून अनेकदा सूचना देऊनही वीज बिलाचा भरणा न केल्याने अखेर महावितरणने शनिवारी सकाळच्या सुमारास या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करत कारवाई केली.

या रजिस्ट्रेशन कार्यालयात घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र शनिवार ते सोमवार सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. आज सकाळच्या सुमालाच रजिस्ट्रेशन करायला तर्फे थकीत बिलाचा भरणा करण्यात आलं व १० वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाचा पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: बाबांनो काहीही करून घड्याळ चालायला पाहिजे, अजित पवारांचे जनतेला आवाहन

Sambhajinagar Lok Sabha: जेव्हा अंबादास दानवे संदीपान भुमरे यांची मिमिक्री करतात!

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

Ajit Pawar: 'यांना जरा दोन पैसे आल्यांतर मस्ती..' बजरंग सोनावणेंविरोधात अजित पवारांचं तिखट वक्तव्य

Maharashtra Politics 2024 : बाटली आणि दोनशे; संभाजीनगरच्या चौकात कशामुळं राडा झाला? अंबादास दानवेंनी अख्खी स्टोरीच सांगितली!

SCROLL FOR NEXT