Today's Marathi News Live : भर रस्त्यात बंदूक घेऊन फिरणाऱ्या गुंडाला कल्याण पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (11 may 2024): लोकसभा निवडणूक, राजकारण, महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि राजकीय घडामोडी, देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी, राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
11 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
11 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

भर रस्त्यात बंदूक घेऊन फिरणाऱ्या गुंडाला कल्याण पोलिसांनी घेतलं ताब्यात

ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

भर रस्त्यात बंदूक घेऊन फिरणाऱ्या गुंडाला बाजार पेठ पोलिसांनी घेतले ताब्यात

केतन बोराडे असे आरोपीचे नाव

केतन बोराडे यांच्यावर 21 गुन्हे दाखल

बंदूक कुणाकडून घेतली व कशासाठी बाळगली होती याचा तपास सुरू

सोलापूरमध्ये तुफान पाऊस, रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली

मुसळधार पावसामुळे सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौक ते बी.टी. कवडे रस्त्यावरील ससाणे उद्यानपर्यंत रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता यांसह विविध भागात वाहतूक कोंडी झाली होती. सध्यांकाळी सहा ते आठ दरम्यान वाहतूक मंदावली होती.

नवनीत राणांच्या मेळाव्याला बोलवून पैसे न दिल्यामुळे महिलांचा गोंधळ

नवनीत राणा यांचा महिला मेळावा आणि रॅली संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती

मेळावा संपल्यानंतर महिलांनी आम्हाला पाचशे रुपये देण्याचे कबूल केले होते मात्र दिले नाही म्हणून घातला गोंधळ

काही महिलांनी तर ज्यांनी आम्हाला पैसे द्यायचे सांगितले होते त्यांच्या बॅगमध्ये पैसे आहे मात्र ते देत नसल्याचा केला आरोप

नवनीत राणा माहितीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या शहरात

वादळी वाऱ्यामुळे महाडमध्ये दोन ठिकाणी लागली आग

जोरदार वाऱ्यामुळे महाडमध्ये घडल्या दोन आग लागल्याच्या दुर्घटना

शॉर्ट सर्कीटमुळे नारळाच्या झाडाला लागली आग

क्रांतीस्थंभ येथील DP ने घेतला पेट

संध्याकाळी वादळी वाऱ्यादरम्यान विज पुरवठा सुरु झाल्यानंतर लागली आग

महाड नगर पालिका अग्नीशमन दल आणि विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिळवल आगीवर नियंत्रण

भर पावसात आढळराव पाटलांची भाषणातून जोरदार बॅटींग

शिरुर लोकसभा सांगता सभेत चाकण येथे भर पावसात शिवाजी आढळरावपाटीलांची भरपाऊसातुन जोरदार भाषणबाजी, डोक्यावर कोसळणारा पाऊस, त्यात मोदींचे कौतुक व कोल्हेंवर टीका व त्याला भर पावसात उपस्थितांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे पावसाच्या थंडीतही राजकीय वातावरण तपल्याची अनुभूती येत होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं

निमंत्रण स्वीकारल्याच पत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकुर यांना पाठवल

सुदृढ लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांनी एकाच व्यासपीठावरुन देशासमोर आपले व्हिजन मांडणे हा सकारात्मक उपक्रम - राहुल गांधी

काँग्रेस या उपक्रमाचे स्वागत करते आणि चर्चेचे निमंत्रण स्वीकारते - राहुल गांधी

पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी व्हावे अशी देशाची अपेक्षा - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला तयार होणार ?

२ दिवसांपूर्वी माजी न्यायमूर्ती मदन लोकुर, माजी न्यायाधीश अजित शाह यांनी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना एकाच मंचावरून चर्चेसाठी पाठवलं होत निमंत्रण

पुणे शहराला सलग दुसऱ्या दिवशी आवकाळी पावसाने झोडपलं

शहर आणि परिसराला अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांचा कडकडाट, वादळी वार्‍यांनी शहराचे चित्रच बदलून टाकले. त्यानंतर सर्वत्र जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. अनेक वाहनांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले.पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस शहरात अवकाळी पावसाची शक्यता आहे.11 व 12 मे रोजी शहरासह जिल्ह्याला ऑरेंज, तर 13 ते 15 मे पर्यंत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.13 रोजी शहरात मतदान आहे, त्या दिवशीदेखील शहरासह जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १५०० तक्रारींवर कार्यवाही

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त १ हजार ५०५ तक्रारींपैकी १ हजार ३२९ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित १७६ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात

धानोरीमध्ये मुसळधार पाऊस

मुंढवा केशवनगर खराडी भागामध्ये पावसाला सुरुवात

घोरपडी मध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात

लोहगावात वादळी वाऱ्यासह पावसाला सुुरुवात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

आज पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वारा झाला. यात गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील शाळेचे पत्रे उडाले. याच शाळेत लोकसभेचे मतदान केंद्र आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उडाले. लोकसभा निवडणूक दोन दिवसावर आली असताना लोकसभेचे मतदानकेंद्र असलेल्या या शाळेचे पत्रे उडाले असून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.शनिवारी दुपारी परिसरात वादळी वारे सुटले होते त्यात रिमझिम पाऊस सुरु असताना वाऱ्याचा वेग वाढला व पाडळसा शाळेचे पत्रे उडाले.सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही मात्र शाळा खोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यासह ११ लोकसभा मतदरसंघातील प्रचाऱ्याच्या तोफा थंडावल्या

पुण्यासह ११ लोकसभा मतदरसंघातील प्रचार आज सायंकाळी ६ वाजल्यापासून थांबला

पुणे जिल्ह्यातील पुणे,शिरूर,मावळ या तीन लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान

पुण्यात प्रचार सांगता भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने केली,तर काँगेस ने पत्रकार परीषद घेत प्रचार सांगता केली

आज पुणे जिल्हयात शरद पवार,देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांनी केल्या सांगता सभा

पुण्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरोधात भाजपचे मुरलीधर मोहोळ अशी लढत

मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरोधात ऊबाठा शिवसेना संजोग वाघेरे अशी लढत

तर शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढळराव पाटील अशी लढत

एमआयएम भाजपची बी टीम; रविंद्र धंगेकर यांचा आरोप

ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे

मला पुणेकरांचे समस्या माहिती आहेत

मी निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचारात आहे

भाजप ची ताकद आहे पण ती कागदावरच राहिली

कसबा जिंकला आता लोकसभा निवडणुकीत विजय व्हायचं आहे

पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल

एम आय एम भाजपची बी टीम आहे तसं काम करत आहे

मोदी सभा झाली त्यात अनेक रिकाम्या खुर्च्या पहिला मिळाल्या आणि राहुल गांधी यांची सभा चांगली झाली

पुणे जिल्ह्यात आचारसंहीता काळात १४ कोटींची रोकड जप्त

- पुणे जिल्हा प्रशासनाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई.

- ⁠आचारसंहीता काळात १४ कोटींची रोकड, दारु, सोनेचादी, ड्रग्ज जप्त

- चार कोटी 34 लाख रुपयांचे रोकड जप्त

- ⁠चार कोटी नऊ लाख रुपयांची दारू जप्त

- ⁠एक कोटी चौदा लाख रुपयांचे ड्गज जप्त

- ⁠एक कोटी एकोणसाठ लाख रुपयाचे सोने-चांदी जप्त

- ⁠तर, जप्त करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, कपडे आणि इतर साहीत्याची कींमत 2 कोटी 78 लाख.

- ⁠14 कोटी रूपयांचे एकूण मुद्देमाल जिल्हा प्रशासनाने केला जाप्त.

- ⁠पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहीती.

शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटलांचं कौतुक

छत्रपतींचे विचार घेऊन त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम केलं.

जरांगे पाटलांची भूमिका काय आहे हे समजून घेतलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे

नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींच्या सभेला तुफान गर्दी, राहुल गांधींनी शेअर केला व्हिडिओ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर केला नंदुरबारच्या सभेतील गर्दीचा व्हिडिओ

आज झालेल्या प्रियंका गांधी यांच्या सभेतील गर्दीचा व्हिडिओ

देशातील प्रत्येक राज्यात INDIA आघाडीचं वादळ - राहुल गांधी

४ जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील

राहुल गांधी यांचा पुनरुच्चार

आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आता कुठे उभे राहायचे ते ठरवावं, खरगेंची निवडणूक आयोगावर टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच निवडणूक आयोगाला पत्र

निवडणूक आयोगाने काल लिहिलेल्या पत्राला दिलं उत्तर

मी माझ्या INDIA आघाडीच्या सहकाऱ्यांना पत्र लिहिलं होत, निवडणूक आयोगाला नाही

पण आयोगाने त्यावर तातडीने उत्तर दिलं हे आश्चर्यकारक

काँग्रेस पक्ष आयोगाच्या बाजूने

आयोगाची ताकद आणि स्वातंत्र्यासाठी काँग्रेस उभा

आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आता कुठे उभे राहायचे ते ठरवाव

खरगे यांचा आयोगाला टोला

दक्षिणेत भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल;  अमित शहा यांना विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काँग्रेस आणि BRS वर जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील

काँग्रेस आणि BRS एकमेकांच्या सोबत आहेत

राहुल गांधी यांना २१ वेळा लाँच केलाय पण ते फेल गेलं आहे

POK भारताचा भाग आहे, त्यावरचा आपला हक्क जाऊ देणार नाही

भाजप तेलंगणात १० पेक्षा जास्त जागा जिंकेल

दक्षिणेत भाजप सर्वात मोठा पक्ष बनेल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई,  ९.७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ९.७५ कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी उघड

शरीरातून कोकेनची तस्करी केल्या प्रकरणी ब्राझिलियन नागरिक अटकेत

ब्राझिलियन नागरिकाच्या शरीरातून जप्त करण्यात आल्या कोकेनने भरलेल्या ११० कॅप्सुल

एकूण ९७५ ग्रॅम कोकेन करण्यात आल जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (DRI) कारवाई

प्रवाशी मुंबई विमानतळावर उतरताच गोपनीय माहितीच्या आधारावर प्रवाश्याला घेण्यात आल होत ताब्यात

चौकशीत त्याने कोकेनने भरलेल्या कॅप्सुलच सेवन केल्याच कबूल करताच प्रवाशाला जे जे रुग्णालयात करण्यात आल भरती

रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली कोकेनने भरलेल्या कॅप्सुल करण्यात आल्या जप्त

ठाकरे गटाचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी दिला भाजपला पाठिंबा

शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची विकासावर विश्वास ठेवून भाजपला पाठिंबा जाहीर करत असल्याचे सुरेश जैन यांनी केले स्पष्ट

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांना आपले बहुमूल्य मत देऊन मोदीजींचे हात बळकट करण्याचे सुरेश जैन यांचे आवाहन

कळवा मुंब्रा दरम्यान आणखी एक दुर्घटना, रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

कळवा मुंब्रा दरम्यान रेल्वेतून पडुन तरुणाचा मृत्यू,

 गेल्या दोन महिन्यांत 5 जणांचा मृत्यू लोकल गाडीत प्रचंड गर्दीचा फटका*

कळवा: ता: 12(बातमीदार) मुंब्रा व कळवा दरम्यान जलद मार्गावर 28 वर्षांचा तरुण पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता 10) ला घड

राज्यातील या जिल्ह्याना पुढचे ३ तास अलर्ट, वीजांच्या कडकडांसह अवकाळी पावसाचा इशारा 

राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन तास वीजाचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या जिल्हांना अलर्ट दिला आहे.

Maharashtra Rain Update :  राज्यातील अनेक जिल्ह्यात ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

3 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आहे.

आज मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे

11,12,13 तीन दिवस लागोपाठ पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट दिसून येईल.

कोल्हापूर, सातारा, पुणे नाशिक या ठिकाणी गारपीट आणि वारे वाहतील

Nashik Lok Sabha : जे बोलणार, ते करुन दाखवणार; शांतीगिरी महाराज यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. शांतीगिरी महाराजांच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, नागरी सुविधा अशा सर्वच क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. जे करणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करून दाखवणार, अशी शांतीगिरी महाराजांच्या जाहीरनाम्याची टॅगलाईन आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्या ठाण्यात सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात सभेसाठी येणार आहेत.

मनसे कार्यकर्ते त्यांचे आनंद नगर चेकनाका या ठिकाणी स्वागत करणार आहेत

त्यांनंतर मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

राज ठाकरे हे आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंद मठ या ठिकाणी दर्शन घेऊन खारे गाव या ठिकाणी रवाना होणार आहेत.

Nitin Gadkari News : आम्ही १० वर्षांत काँग्रेसच्या ३ पटीने काम केलं; गडकरींची टीका

नितीन गडकरी काय म्हणाले?

नितीन गडकरी यांनी पुण्यातून काँग्रेसवर टीका केली आहे. '६० वर्षात काँग्रेसने केलेली कामाची तुलना केली, तर आम्ही १० वर्षात केलेली कामे तीन पटीने काँग्रेसपेक्षा जास्त काम केलं आहे, असं म्हणत गडकरींनी काँग्रेसवर टीका केली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रागा

रायगड - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. माणगावमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा आहे. दोन्ही बाजूकडे सहा ते सात किलोमीटरच्या रांगा आहेत. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुट्टीसाठी आलेल्या पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले.

pune news : पुण्यात गेल्या १० दिवसांत ९६ झाडपडीच्या घटना

पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पाऊसाने झाडपडीच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यात गेल्या १० दिवसात एक ते दहा मे दरम्यान अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात शहर परिसरात झाडपडीच्या एकूण ९६ घटनांची नोंद झाल्या आहेत. मागील दोन दिवसात ५४ झाडे पडली. जवानांनी घटनास्थळी पोहोचत तत्परतेने आपले कर्तव्य बजावले आहे.

Rahul Shewale : चेंबूरमधील रहिवाशांसह राहुल शेवाळे यांचा मॉर्निंग वॉक

मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत चेंबूरमधील रहिवाशांसोबत संवाद साधला.

चेंबूरच्या नारायण आचार्य उद्यानात मॉर्निंग करणाऱ्या रहिवाशांनी यावेळी शेवाळे यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेविका आशाताई मराठे देखील उपस्थित होत्या.

Mumbai News  : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यामिनी जाधवांच्या प्रचारासाठी येणार

दक्षिण मुंबई उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी संध्याकाळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे मुंबई मध्ये येणार आहेत. दक्षिण मुंबई मतदार संघात राजस्थान गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजपकडून भजनलाल शर्मा यांना प्रचारासाठी रिंगणात उतरवले आहे.

Ratnagiri : रत्नागिरी शहराला पाणी टंचाईच्या झळा

रत्नागिरी - रत्नागिरी शहराला पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. सोमवारपासून रत्नागिरी शहराला एक दिवसाआड पाणी येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या शीळ धरणात 20 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जूनच्या पंधरवड्यापर्यंत पुरेल एवढाच शीळ धरणात पाणीसाठा आहे.

Pune News : मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिले महत्वाचे आदेश

पुण्यात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलिसांना आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शहर आणि जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडावी, यासाठी त्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी रोजी होणार आहे.

Nagpur News : नागपुरात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर दिवसाच्या उकाड्यात वाढ

नागपुरात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर दिवसाच्या उकाड्यात वाढ झाली आहे. किमान तापमान 3.9 डिग्री सेल्सियसने वाढले आहे. वातावरण दमट झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. तर आर्द्रता 70% टक्क्यांवर पोहोचली आहे. मध्यप्रदेशात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि दक्षिण भारतातील सिस्टममुळे विदर्भातील आर्द्रता वाढली.

lok Sabha Election : चौथ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; दोन दिवस उत्सुकता

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज शनिवारी थंडावणार आहेत.

छत्रपती संभाजी नगर लोकसभेच्या जागेसाठी एकूण 37 उमेदवार रिंगणात आहेत.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करण्याची मुभा देखील आहे.

Nandurbar News :  आज प्रियांका गांधींची नंदुरबारमध्ये जाहीर सभा

नंदुरबार लोकसभेची चुरस आता चांगलीच वाढलेली आहे.

महाविकास आघाडीची उमेदवार अॅड गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी आज नंदुरबारमध्ये जनसभा घेणार आहेत.

काल मोदींनी केलेल्या काँग्रेसच्या आरोपांना प्रियंका गांधी काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नंदुरबार शहरातील छत्रपती हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे.

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट; संवेदनशील ठिकाणी काढला 'रुट मार्च'

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून 'रुट मार्च' काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी 'रुट मार्च' काढला. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. सोमवारी पुण्यात मतदान पार पडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com