Powai News Google
मुंबई/पुणे

Powai News: अल्पवयीन मुलाला दारू देणं भोवलं; रेस्टॉरंट मालकावर मोठी कारवाई, मुंबईतील प्रकार

Powai News: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला दारु देणाऱ्या पब मालकावर कारवाई झाली आहे. त्यानंतर आता मुंबईतील एका पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारु सर्व्ह करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील हिट अँड रन हे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील एका पब मालकाने अल्पवयीन मुलाला दारु सर्व्ह केली आहे अल्पवयीन मुलाला दारु दिल्यामुळे पबमालकाला अटक केली आहे. मुंबईतील पवई येथील लोटस बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका अल्पवयीन मुलाला मद्य सर्व्ह केले जात होते.

पवईतील लोटस बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका १६ वर्षीय मुलाला दारु सर्व्ह केली जात होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी लोटस बार अँड रेस्टॉरंटच्या मॅनेजर आणि वेटर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत वेटरने एका सोळा वर्षीय मुलाला मद्य दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वेटर आणि मॅनेजरवर कारवाई केली आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. पुण्यात जी घटना घडली ती मुंबईत घडू नये यासाठी पोलिस खबरदारी घेत आहे. याप्रकरणी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलम ७७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उत्पादन शुल्क विभागाच्या परवाना विभागाला कारवाईचा अहवाल पाठवणार आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाला दारु देण्यात आली होती. त्या पब मालकावर आणि व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT