पहा व्हिडीओ : मुंबईवरती दहशतवादी हल्याची शक्यता; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द Saam TV
मुंबई/पुणे

पहा व्हिडीओ : मुंबईवरती दहशतवादी हल्याची शक्यता; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

नववर्षाच्या प्रारंभाला मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये खलिस्तानी संघटना काही दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नववर्षाच्या प्रारंभाला मुंबईवर दहशतवादी हल्ला ( Terrorist Attack) होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये खलिस्तानी संघटना काही दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे. याबातची माहिती रेल्वे पोलीस कैसर खालिद यांनी दिली आहे.

पहा व्हिडीओ -

आणि यामुळेच मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या साप्ताहिक सुट्यांसह (Weekly Vacations) इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबईमध्ये (Mumbai) पोलिसांकडून हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आल्याने सर्व पोलिसांना कामावरती येण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

शिवाय ज्या ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते तिथे जास्तीचा आणि चोख बंदोबस्त करण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) देण्यात आले आहेत. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, अतिरेकीविरोधी विभागालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त आणि प्रवक्ता उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT