Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

राणेंचा अदीश-निलरत्न अडचणीत, मुंबईतील अदीशवर आज कारवाईची शक्यता

18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतरा पुन्हा एकदा आज सकाळी दहा वाजता महापालिका पथक सांताक्रुज पोलीस स्टेशन येथे रवाना होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - नारायण राणे (Narayan Rane) यांचा मुंबईतील (Mumbai) अदीश आणि मालवण येथील निलरत्न बंगला अडचणीत सापडला असून, आज पालिकेचे अधिकारी राणेंच्या आदीश बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अदीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) नोटीस बजावण्यात आली आहे.

हे देखील पहा -

18 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतरा पुन्हा एकदा आज सकाळी दहा वाजता महापालिका पथक सांताक्रुज पोलीस स्टेशन येथे रवाना होणार आहेत. त्यानंतर तिथून सकाळी 11 वाजता जुहू येथे पोहोचणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बंगल्यावर काय कारवाई होते हे पाहण्याचे ठरणार आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांचा मालवण येथील देखील बंगला अडचणीत सापडला आहे.

केंद्रानेच 9 ऑगस्ट 2021 ला दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. नारायण राणे यांच्या मालवणी येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली होती. त्यांतर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरनला कारावाई करण्याचे आदेश 9 ऑगस्ट 2021 ला दिले होते.

Edited By- Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT