नागपूर - आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही. निवडणुका आल्या की आघाडीची चर्चा सुरू होते. काल तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती ही झाली आहे. भविष्यात राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल झालेल्या बैठकीबाबद दिली आहे.
हे देखील पहा -
पुढे चंद्रकांत पाटील यांच्या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करण्याची गरज नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या पक्षाच्या मुख्य प्रवाहात ठाकरे कुटुंबासोबत आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा त्यांचा पक्ष दिवसागणिक झिजतो आहे.
पुढे राऊत म्हणले की, आम्ही हे कधीच नाही म्हणालो की काँग्रेसच्या शिवाय काही आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जीनी असं सूतोवाच केलं होतं. तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता, ज्यांनी काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली. ही भाजपची सवय आहे. जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात. उत्तर प्रदेशात भाजप पराभूत होत आहे. त्यामुळे त्यांचे अखेरचे प्रयत्न सुरू आहे. देशात लोकशाही संपत आहे त्याचेच हे परिणाम आहे असे देखील संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा बदलली आहे असं मुळीच वाटत नाही. जे महाराष्ट्रद्रोही आहे, जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या मनात महाराष्ट्र विषयी द्वेष आहे अशा लोकांना जी भाषा समजते त्याच भाषेतच बोलावं असं आमचे संत सांगून गेले आहे. जर एखादा महाराष्ट्रद्रोही राजकीय पक्षाचा बुरखा घालून आमच्यावर थुंकत असेल तर मला वाटतं मी खूपच सौम्य भाषा वापरली आहे असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.