Poonam Mahajan Poonam Mahajan
मुंबई/पुणे

Maharashtra politics : प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र? पूनम महाजन यांच्या आरोपाने खळबळ

Pramod Mahajan : पूनम महाजन यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. महाजनांची हत्या कुणी केली? याची चर्चा सुरु झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Poonam Mahajan : तब्बल दोन दशकांनंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. निमित्त ठरलंय प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपाच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या गंभीर आरोपाचं.

महाजनांची हत्या कुणी केली? हत्येच्या चौकशीसाठी गृहमंत्र्यांना पत्र

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र होतं ते कधीतरी बाहेर येईलच, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला आहे.

प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर जवळजवळ दोन दशकांनंतर पूनम महाजन यांनी हा आरोप केला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या हा एक मोठा कट होता आणि त्याच्या चौकशीसाठी राज्यातील आणि केंद्रातील गृहमंत्र्यांना पत्र लिहणार असून हत्येच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

प्रमोद महाजन यांचे सख्खे बंधू प्रविण महाजन यांनी 2006 मध्ये राहत्या घरी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पन केलं. पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती तर त्यामागे मोठं षडयंत्र होतं असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. आता 18 वर्षानंतर देशातील या सर्वात मोठ्या हायप्रोफाइल हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

SCROLL FOR NEXT