Kalyan: चौदा गाव आणि शीळ परिसरात प्रदूषणाचा गुंता सुटता सुटेना... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan: चौदा गाव आणि शीळ परिसरात प्रदूषणाचा गुंता सुटता सुटेना...

चौदा गाव आणि शीळ परिसरात केमिकल आणि भंगार माफियांनी घातला आहे हैदोस घातला आहे. मात्र प्रदूषण महामंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली: शीळफाटा लागून असलेल्या आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १४ गावांमधील प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदीस वाढत चालला आहे. पावसाळ्यात नदी पात्रात आणि शेतात केमिकल सोडल्यानंतर आता थंडीच्या दिवसात केमिकल मिश्रित कचऱ्याच्या गोण्या थेट उघड्यावर जाळल्या जात असल्याने हा प्रदूषणाचा गुंता सुटणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही ठीकाणी केमिकलयुक्त रसायन हे जमिनीत गाडले जात आहे. याबद्दल  मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र प्रदूषण महामंडळ याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे हे गोरखधंदे थांबणार कधी? आणि १४ गावांचा प्रदूषणाचा गुंता कधी सुटणार असा प्रश्न सध्या निर्माण आहे. (Pollution in 14 villages and Shil area will not go away)

हे देखील पहा -

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या १४ गावांजवळ मोठ्या प्रमाणात वनविभागाची जागा आहे. या जागेवर भंगार माफियांनी ताबा मिळवला आहे आणि रात्रीच्या अंधारात सर्रासपणे केमिकल हे जमिनीमध्ये गाडले जात आहे. तर काही ठिकाणी जाळले जात आहे. १४ गावांना वायू प्रदूषणाने ग्रासले असून जल प्रदूषणास देखील सुरुवात झाली आहे. मात्र हे प्रदूषण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे. गोठेघर ते दहिसर परिसरात मोठ्या प्रमाणात वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रम करून भंगार माफियांमाकडून जामीन बळकावून गोडाऊन बांधून प्रदूषण करत वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण महामंडळ, वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस याकडे कधी लक्ष देणारा असा सवाल उपस्थित होत आहे. 

दुसरीकडे प्रदूषणाने भात शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे. तर पिण्याचे पाणी देखील पिण्यायोग्य राहणे कठीण झाले आहे. सदर ठिकाणी पूर्वी वन्यप्राणी आढळत असत, मात्र आता ते पण दिसेनासे झाले आहे. १४ गाव परिसर, मलंगगड आणि शीळ विभाग यात मोठ्याप्रमाणात केमिकल, केमिकल युक्त कचऱ्याच्या गोण्या जमिनीत गाडल्या जात आहे आणि जाळल्या जात आहेत. भंगार माफियांकडून प्रदूषण करण्यासाठी नदी पात्र किंवा डोंगराळ भागाचा आसरा घेतला जात आहे. त्यामुळे आता प्रदूषण महामंडळ, वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT