पुण्यात दर तासाला 6 टन सिमेंट धूळ हवेत मिसळते.
सिमेंट प्लांटमुळे वायू प्रदूषणात वाढ.
नागरिकांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता.
पर्यावरणीय नियंत्रण आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज.
गुन्हेगारांचं शहर ही ओळख कमी होती की काय म्हणून आता पुणे विषारी हवेचं शहर बनू पाहतंय. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दर तासाला तब्बल 6 टन सिमेंटचं विष मिसळलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे शहरातील रेडी मिक्स सिमेंटचे प्लांट पुणेकरांच्या जीवावरच उठल्याचं दिसतंय. सिमेंटच्या प्लांटमुळे पुणेकर दररोज कसा विषारी श्वास घेत आहेत ते पाहूयात.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या हवेत दरवर्षी तब्बल 50 हजार टन सिमेंटचे विष कालवले जाते. पुणे आणि पिंपरीत एकूण 502 अधिकृत प्लान्ट्स आहेत. त्यातील 372 प्लान्ट्स पुण्यात तर सुमारे 130 प्लान्ट्स पिंपरी- चिंचवड शहरात आहेत.
एक प्लांट वर्षांला सुमारे 100 टन धुलिकण हवेत सोडतो. दिवसाला 137 टन तर दर तासाला 6 टन सिमेंट हवेत मिसळले जाते. वडगाव, हडपसर, वाकड, चिखली, खराडी, कात्रज, हिंजवडी, मोशी, पुनावळे हे आरएमसी प्लांटचे हॉटस्पॉट आहेत. 30 टक्के वायू प्रदूषण एकट्या सिमेंटमुळे होत असल्याचं निष्पन्न झालंय. एवढंच नव्हे तर सिंमेंट प्लांटमुळे जल आणि मृदा प्रदूषणातही वाढ झालीय.
पुण्यात 502 प्लांट्स व्यतिरिक्त तब्बल 175 आरएमसी अनधिकृत प्लांट आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केलाय. पुणेकरांना या सिमेंट प्लांट्सचा कसा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या तोंडून ऐका.
मुळात आरएमसी प्लांट शहरीवस्तीपासून किमान 200 मीटर अंतरावर असावेत, असा नियम आहे.. मात्र नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्लांट सुरू आहेत. पुण्यातील संगमवाडी परिसरात आरएमसी प्लांटचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान आरएमसी प्लांटमुळे कोणत्या घातक घटकांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, पाहूयात.
सिलिका धूळ
'सिलिकॉसिस' होऊन फुफ्फुसे निकामी होतात आणि कर्करोगाचा धोका
कॅल्शियम ऑक्साईड
क्षारयुक्त घटकामुळे डोळे आणि त्वचेची आग
फुफ्फुसांच्या आतील भागाला जखमा होतात
अॅल्युमिनियम ऑक्साईड
दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांना तीव्र झटके येऊ शकतात.
अल्कली आयन्स
डोळ्यांच्या पडद्याला हानी पोहोचवतात आणि सतत श्वास घेण्यास अडथळा
क्लोराईड्स, सल्फेट्स
हृदयविकार आणि जुनाट श्वसन आजार बळावतात
पुण्यातील वाढत्या प्रदुषणामुळे 2025 मध्ये 6 रेडी मिक्स काँक्रिट प्लांट बंद करण्यात आले असून 30 प्लांट्न्सना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आता पुणे आणि पिंपरीच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक तब्बल 300च्या वर गेलाय. त्यामुळे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ आता तरी जागं होणार का? की पुणेकरांचा श्वास सिमेंटच्या धुळीत गुदमरत राहणार? असा सवाल उपस्थित होतोय. विकासाला विरोध नाही मात्र तो थेट नागरिकांच्या जीवावर उठणारा असेल तर राज्यकर्त्यांनी त्याबाबत कडक धोरण आखण्याची गरज आहे. अन्यथा विद्येचं माहेरघर विषारी वायूचं केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.