भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या चकमकीतील मृत्यूनंतर विरोधकांनी पोलिसांवर संशय व्यक्त करत सरकारला धारेवर धरलंय. अक्षय शिंदेच्या मृत्यूवरुन विरोधकांची फायरिंग सुरु असतानाच आता सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनीही पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय.
चार पोलीस असताना रिव्हॉल्वर हिसकावली कशी? , असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
बदलापूर प्रकरणानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. आरती सिंह यांच्या तपास पथकाचा अहवाल येणं बाकी आहे. त्यापुर्वीच अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून पोलिस ठाण्याकडे नेत असताना मुंब्रा बायपासवर त्याने पोलिसांचं पिस्तूल हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या मृत्यूवरून विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यांनी सरकारला सवाल केला आहे की, अक्षय शिंदेला आणताना पोलिसांनी विशेष काळजी का घेतली नाही? तर माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, अक्षय शिंदे बंदूक हिसकावत असताना बाकीचे पोलिस झोपले होते का? हातात बेड्या असताना बंदूक हिसकावून फायरिंग कशी केली? आरोपीला नेताना पोलिसांची बंदूक लॉक नव्हती का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याने सरकारने आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीची स्थापना केलीय.. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवं. अन्यथा या एन्काऊंटरमुळे इतर गुन्हेगार मोकाट सुटता कामा नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.