Political Shock Mumbai Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिंदे गटातील नेत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी ५ लाख रूपये घेताना रंगेहाथ पकडलं

Political Shock crime news: शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणीप्रकरणी अटक.एमआयडीसी पोलिसांनी राय यांना ५ लाख घेताना रंगेहाथ पकडलं.

Bhagyashree Kamble

  • शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणीप्रकरणी अटक

  • एमआयडीसी पोलिसांनी राय यांना ५ लाख घेताना रंगेहाथ पकडलं

  • आरोपीची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं

  • अंधेरी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. खंडणीप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं. आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं माजी नगरसेवकाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

कमलेश राय असे माजी नगरसेवकाचं नाव आहे. ते शिवसेना शिंदे गटातील नेता असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर पाच लाखांची खंडणी उकळण्याचा आरोप आहे. एमआयडीसी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईला सुरूवात केली. शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी कमलेश राय यांना खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं.

मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. कमलेश राय यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना महापालिकेच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. आज एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली असून, आरोपी कमलेश राय यांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आठ लाख रुपये रिकव्हर करण्यासाठी अंधेरी न्यायालयाकडे पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली.

मात्र न्यायालयाने आरोपी कमलेश राय यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल

Hartalika Vrat 2025: हरतालिकेची पूजा घरी कशी करायची? जाणून घ्या व्रताचे नियम

Guardian Minister : आताची सर्वात मोठी बातमी! सावकारेंचं डिमोशन, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले

Ladki Bahin Yojana: आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Kokan Railway : लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवाशांची झुंबड; रेल्वेत कोकणवासीयांचे हाल

SCROLL FOR NEXT