Andheri East Bypoll Election BJP Vs Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Andheri East Bypoll Election: भाजप उमेदवार मुरजी पटेलांचा अर्ज रद्द करा; ठाकरेंकडून ५ आक्षेप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर, मुंबई

Andheri East Bypoll Election मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून तसं पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. त्यात मुरजी पटेल यांचा निवडणूक अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या पत्रात मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर चार ते पाच आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर नोंदवण्यात आलेले आक्षेप

१. २०१७ पासून सहा वर्षांची निवडणूक लढण्यास बंदी असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला.?

२. निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला?

३. या दोन्ही प्रकाराची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ती लपवण्यात आलीय.

४. निवडणूक लढण्यास बंदी असल्याने, त्यांचा मतदान करण्याचा अधिकार देखील काढून घ्यावा.

५. त्यांच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवली.

मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा. मुरजी पटेल यांनी अनेक गुन्ह्यांची माहिती लपवली आहे. त्यांनी फसवणूक केली आहे, असा आरोपही नाईक यांनी केला.

निवडणूक आयोगाने (Election) सर्व आक्षेप फेटाळले आहेत. पण ते का फेटाळले हे माहीत नाहीत. कोणाच्या दबावाखाली केले आहे हे माहीत नाही. मुरजी पटेलसारख्या भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या माणसाला भाजप कशी उमेदवारी देऊ शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT