Sharad Pawar Resigns Latest Update Saam TV
मुंबई/पुणे

NCP New President: राष्ट्रवादीला अध्यक्षपदासाठी नवा चेहरा मिळणार? शरद पवारांच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष

NCP New Cheif Meeting: शरद पवार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2024 पर्यंत तरी किमान अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे.

Rashmi Puranik

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार की नाही याचा फैसला आज होऊ शकतो. शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव आजच्या निवड समितीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल ठेवणार आहेत. आज 16 सदस्यांची सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठक आहे. शरद पवार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2024 पर्यंत तरी किमान अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता आहे.

मात्र शरद पवार अध्यक्षपदी न राहिल्यास सुप्रिया सुळे यांना एकमताने अध्यक्ष करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

देशभरातून विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनीच राहावं यासाठी देशातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे त्यांना फोन आल्याची माहिती आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, माकपचे नेते सीताराम , आम आदमी पार्टीचे संजय सिंग, सीपीआयचे डी राजा यांचा शरद पवारांना फोन आल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा असं विरोधी पक्षांचे मत आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अध्यक्ष निवड समितीतील सदस्य

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, एकनाथ खडसे.

इतर सदस्य

फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT