Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar on Karnataka Election: कर्नाटक निकालाबाबत शरद पवारांकडून महत्वाचं निरीक्षण; पक्षातील नेत्यांना केलं सावध

Rashmi Puranik

Sharad Pawar on Karnataka Result: कर्नाटकच्या निकालानंतर राज्यातील  महाविकास आघाडीतील पक्षांनाही उर्जा मिळाली आहे. कर्नाटक निकालमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे सर्वच नेते अॅक्टिव्ह झाले आहेत. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांनी आतापासून कंबर कसायला सुरुवात केली आहे.

राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवारांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं. कर्नाटकात काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पराभव सामोरे जावे लागलं, असं निरीक्षण  शरद पवार यांनी नोंदवलं.

धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न फसला

भाजपने कर्नाटकमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जनतेने त्यांना नाकारले. आमदार फुटून जाऊन भाजपला मदत करतील अशी स्थिती ठेवली नाही, त्यामुळे स्पष्ट बहुमत काँग्रेस पक्षाला मिळाले. यातून मतदारांचा कौल दिसून येतो, असं शरद पवार यांनी सांगितलं.

अशारितीने पक्ष सोडून जाण्याच विचार करणाऱ्या नेत्यांना शरद पवार यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रतील परिस्थितीचा अप्रत्यक्षपणे अंदाज दिला. काँग्रेस पक्ष सोडून भाजप बरोबर गेलेले किंवा भाजपला मदत करू शकणाऱ्यांना जनतेने नाकारले, असं शरद पवारांनी निरीक्षण नोंदवलं.

महाविकास आघाडी भक्कम ठेवा- पवार

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी भक्कम ठेवा, लोकसभा आणि विधानसभा एकत्रितच लढवायच्या आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार

जे तीन वर्षांपेक्षा जास्त जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर आहेत, त्यांना बदलण्यात येणार.

विभागवार शिबिरे घेण्यात येणार, तिथे राज्यातील प्रश्नांवरच चर्चा होणार.

राष्ट्रवादीची १० जून रोजी मोठी सभा होणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT