Devendra Fadnavis, amruta fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: माझ्या कुटुंबियांना गोवण्याचा प्रयत्न झाला, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा

अमृता फडणवीस यांना धमकीचा फोन आला होता, असा खुलासाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

साम टिव्ही ब्युरो

Amruta Fadnavis News: अमृता फडणवीस धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यात येत आहे. तर कुटुंबाला यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. अमृता फडणवीस यांना धमकीचा फोन आला होता, असा खुलासाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्या पत्नीने या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करुन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र वारंवार बुकींचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा माझ्या पत्नीने त्यांना फोनवर ब्लॉक केलं. त्यानंतर काही अनोळखी नंबरहून काही व्हिडीओ क्लिप आल्या.  (Latest Marathi News)

या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या. त्यातून मला देखील अडचणीत आणण्याची धमकी देण्यात आली. माझे सगळ्या पक्षांची चांगले संबंध आहेत, त्यामुळेत तत्काळ आम्हाला मदत करा असं समोरच्या व्यक्तीने सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

डिझायनर महिलेला अटक

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी यांना ताब्यात घेतलं. उल्हासनगरमधल्या राहत्या घरातून अनिक्षाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा!

Shocking : नागपूरच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत! माकडाकडून बॅग घ्यायला गेले अन् १५० फूट खोल दरीत कोसळले

Healthy Eating : डाळिंबाचे दाणे साठवण्याची 'ही' योग्य पद्धत वापराल, तर दिवसभर राहतील टवटवीत आणि रसरशीत

Election Result : आजीच्या पराभवाचा घेतला बदला; काँग्रेस नेत्याच्या सुनेला २१ वर्षांच्या नातीने हरवले

Diwali Abhyang Snan : दिवाळीच्या पहाटे किती वाजता करावे अभ्यंगस्नान? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तारीख अन् योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT