Shinde Fadnavis - Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Saamana Editorial : बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच, सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Saamana Editorial On Shinde Fadnavis Government: कोल्हापूर-नगर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचे हे सुनियोजित तंत्र आहे.

साम टिव्ही ब्युरो

Saamana Editorial : औरंजेबावरुन राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आधी अहमदनगर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आले नंतर कोल्हापुरातील एका युवकाने स्टेटलसा ओरंगजेबाचा फोटो ठेवल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही घटनामुळे संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध मोर्चे काढले.

कोल्हापुरात निघालेल्या हिंसक वळण लागल्याने परिस्थिती चिघळली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या घडामोडींवर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून टी करण्यात आली आहे. रस्त्यावर उतरून गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगतात याचा अर्थ काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच आहे. हे भाजपचे व मिंध्यांचे राजकारण लेचेपेचे राजकारण असल्याचं सामनातून म्हटलं आहे. (Latest Marathi News)

अस्वस्थ करायचे कारस्थान सुरू

कोल्हापूर-नगर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचे हे सुनियोजित तंत्र आहे. औरंगजेबाच्या नावाने स्टेटस ठेवणे वगैरे गोष्टी निमित्त आहेत. कोल्हापूर आणि नगरसारख्या जिल्ह्यांना एक सामाजिक, राजकीय वारसा आहे. ही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची स्थाने आहेत, पण याच जिल्ह्यांना धार्मिक कारणाने अस्वस्थ करायचे कारस्थान सुरू आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातच बहादूरशाह जफर याच्या फोटोलाच औरंगजेबाचा फोटो समजून एका दुकानाची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. आताही कोल्हापुरात ज्या तरुणाने मोगल राजाचा स्टेटस ठेवला तो नक्की औरंगजेब होता की टिपू सुलतान, याची माहिती पोलिसांकडे नाही. तरीही क्षणात शेकडो लोक रस्त्यावर उतरून गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगतात याचा अर्थ काय? असा सवालही सामनातून विचारण्यात आलाय. (Latest Political News)

औरंगजेबाची कबर खोदण्याचे काम सुरू

एका रात्रीत संदेश देऊन त्यांना रस्त्यावर आणले गेले व हिंदुत्वाच्या नावाने त्यांची डोकी भडकवली गेली. औरंगजेब हे आता महाराष्ट्रातील राजकारणाचे नवे हत्यार झालेले दिसते. कर्नाटकात बजरंगबलीची गदा जाहीर सभांत फिरवूनही भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हिंदुत्व नासवण्याचा आणि विकृतीकडे नेण्याचा हा प्रकार आहे.  (Breaking News)

शिवरायांच्या इतिहासावर माती टाकण्याचे काम कोण करतंय?

दोन दिवसांपूर्वीच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा लाखोंच्या गर्दीत साजरा झाला व त्या सोहळ्याचे ढोल-नगारे, तुताऱ्या, रणशिंग वाजत असतानाच कोल्हापुरात औरंग्याच्या नावाने दंगल घडवली गेली. औरंग्यास जिवंत करून शिवरायांच्या इतिहासावर माती टाकण्याचे हे काम कोण करीत आहे? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील

गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱयात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठीच औरंगजेबाचा मुडदा उकरला जात आहे. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल. तिकडे मणिपूर पेटले आहे ते यांना विझवता येत नाही. इथे महाराष्ट्र पेटवू पाहत आहेत. हा आगीशी खेळ त्यांना महाग पडेल. तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील. हा इशारा आम्ही महाराष्ट्र हितासाठी देऊन ठेवीत आहोत, असं सामनात म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT