Sharad Pawar And Prashant Jagtap Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics: पुण्यात राजकीय भूकंप! शरद पवारांना मोठा धक्का, प्रशांत जगताप राष्ट्रवादीला ठोकणार रामराम

NCP Leader Prashant Jagtap Resigns: पुण्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.

Priya More

SUMMARY -

  • पुण्यात शरद पवार गटाला मोठा धक्का

  • शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार

  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास केला तीव्र विरोध

  • शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार

अक्षय बडवे- सागर आव्हाड, पुणे

महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मोठी राजकीय घडामोड घडली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यास त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी मोठा पाऊल उचलत शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. यासाठी ते मुंबईला रवाना झालेत. प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शांतात पाहायला मिळत आहे.

प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी पक्ष सोडणार असल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली होती. त्यांनी यासंदर्भातला प्रस्ताव देखील पक्षासमोर मांडला होता. त्यानंतर नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनाम देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा दिला तर पुण्यात पालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम ठोकल्यानंतर प्रशांत जगात दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दिवसांत प्रशांत जगताप निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यात पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर स्थानिक पातळीवर निर्णय होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज सुद्धा पुणे शहरातील नेते एकत्र बैठक घेणार आहेत. या बैठकीत जागांच्या संख्येवर चर्चा केली जाणार आहे. कुठल्या जागेवर कुठल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट दिले जाऊ शकतं यावर देखील चर्चा होणार आहे. बैठकीत महाविकास आघाडीमध्ये एकूण जागांच्या शेअरिंगबद्दल सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी एक पाऊल पुढे आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यामधील ३ नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहेत. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे आज अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या बारामती होस्टेलमध्ये हे तीन नेते अजित पवारांची घेणार भेट आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रस्ताव घेऊन तिन्ही नेते अजित पवारांना भेटणार आहेत. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील, विधानसभेच्या माजी उपाध्यक्षांचा दावा|VIDEO

मॉडेल समुद्राच्या किनार्‍यावर देत होती पोझ, अचानक लाट आली अन्... VIDEO व्हायरल

Glowing skin: पिंपल फुटल्याने चेहऱ्यावर खड्डे पडलेत? या घरगुती उपायांनी मिळेल सॉफ्ट आणि ग्लोईंग त्वचा

Akola : "नवरदेव तयार आहे, पण..." प्रकाश आंबेडकरांच युतीबाबत मोठं विधान!

SCROLL FOR NEXT