आजच्या बंद मध्ये, पोलिसांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून वागू नये - मनसे SaamTV
मुंबई/पुणे

आजच्या बंद मध्ये, पोलिसांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून वागू नये - मनसे

आजचा बंद हा सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखा.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज 11 ऑक्टोबर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या पक्षांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. लखिमपूर खेरी Lakhimpur Kheri येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र या 'बंद' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MNS विरोध दर्शवला आहे . लखिमपूर घटना दुर्देवी आहे , त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, मनसे या घटनेचा निषेध करतो, पण त्यासाठी महाराष्ट्र बंद Maharashtra Bandh करण्याची गरज काय ? असा प्रश्न मनसेकडून विचारला जातोय, तसेच जिथे कोणी व्यापारी वा नागरिक बंद साठी होणाऱ्या दबावाचा प्रतिकार करण्यासाठीची तक्रार जिथे दाखक करेल तिथे पोलिसांनी कारवाई करायला हवी त्यांनी राज्य सरकारचे कार्यकर्ते म्हणून वागू नये असं मनसे कडून वक्तव्यं करण्यात आलं आहे.(Police should not act as activists of Mahavikas Aghadi)

हे देखील पहा -

आजच्या बंद दरम्यान ST, बेस्ट बस Best Bus, टीएमटी TMT आणि इतर सरकारी आस्थापनांच्या सेवा बंद ठेवल्या जातायत . पण गेल्या दीड वर्षांपासून ताळेबंदीमुळे LockDown महाराष्ट्र बंद होता, त्यामुळे व्यापाऱ्यांचं Merchants मोठं नुकसान झालंय , आर्थिक घडी कोडमळलेली असताना आजचा बंद हा सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखं असल्याचं मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारवर Cntral Goverment महाविकास आघाडी सरकारचा राग आहे , हा राग काढण्यासाठी महाराष्ट्र बंद राजकीय स्वार्थासाठी बंद केला आहे , पण त्यामुळे व्यापारी भरडला जातोय. या बंद दरम्यान सरकारने स्वतःची सरकारी यंत्रणा वापरून बेस्ट, एसटी बंद ठेवणे, तसेच काही व्यापारी संघटना बोलावून त्यांच्यावर दबाव आणायचा, युनियन व्यापाऱ्यांवर Union Merchants दबाव आणायचा असं करून हा बंद केला आहे.

तसेच या बंदला उत्स्फूर्तपणा कुठेही दिसत नाही. त्यामुळे जर का कोणी दादागिरी करून व्यापाऱ्यांना बंद ठेवायला भाग पडणार असेल, तर मनसे त्यांना संरक्षण देईल. आणि पोलिसांनी देखील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून वागू नये. जिथे कोणी व्यापारी वा नागरिक तक्रार दाखक करेल, जिथे तिथे पोलिसांनी कारवाई करायला हवी असं मत मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार व्यक्त केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT