Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवार यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली; पोलिसांचा चोख बंदोबस्त, काय आहे कारण?

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पवारांच्या देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या अध्यात्मिक सेल कडून आंदोलन केलं जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

काय आहे कारण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते, असं अजित पवारांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरून शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह भाजपच्या नेत्यांकडूनही राज्यात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. या आंदोलनात भाजपसह शिंदे गटातील नेते सहभागी होणार आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे.

मुंबई पुण्यासह आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहे. दरम्यान, हीच बाब लक्षात घेता, अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी शासकीय या निवासाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनाद करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार ३ जिल्ह्यांचा दुष्काळ दौरा

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Ratnagiri Water Stock : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! पुढील ५ महिने टेन्शन नाही, धरणांमध्ये किती साठा?

ICICI बँकेची दिवाळीपूर्वी मोठी घोषणा! FD च्या व्याजदरात वाढ, कोणत्या मुदत ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

SCROLL FOR NEXT