Viral: ठुमके देत पोलीसाचा धमाकेदार गोविंदा डान्स...(पहा व्हिडीओ) Saaam Tv
मुंबई/पुणे

Viral: ठुमके देत पोलीसाचा धमाकेदार गोविंदा डान्स...(पहा व्हिडीओ)

38 वर्षीय मुंबई पोलीस कर्मचारी अमोल यशवंत कांबळे यांनी त्यांच्या नृत्याच्या व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर एक विशेष ओळख निर्माण केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : 38 वर्षीय मुंबई पोलीस Mumbai Police कर्मचारी अमोल यशवंत कांबळे यांनी त्यांच्या नृत्याच्या Dance व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर Social Media एक विशेष ओळख निर्माण केली आहे. नवीनगाव पोलिस मुख्यालयात पोस्ट केलेले अमोलचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हजारो लोक त्याचा व्हिडिओ पसंत करत आहेत.

ड्यूटी संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी अमोल डान्स करतात. सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर Instagram त्याच्या नृत्याचा व्हिडिओ पोस्ट Post केल्यावर त्यांचा हा टॅलेंट लोकांसमोर आला आहे. अमोलने 'अप्पू राजा' या मराठी चित्रपटातील 'आया है राजा' या गाण्यावर नृत्य केले आणि एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ खूप कमी वेळात व्हायरल Viral झाला आणि या व्हिडीओने लोकांनी खूप प्रशंसा केली. एका व्हिडीओमध्ये ड्युटीवर असलेले अमोल दुचाकी चालकाला मास्क व्यवस्थित लावायला सांगत आहे आणि मग दोघेही नाचू लागले.

लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या अमोल यांचा लाखो लोक त्याच्या नृत्याचे व्हिडिओ पसंत करत आहेत. माहिमचा रहिवासी अमोल यशवंत कांबळे 2004 मध्ये मुंबई पोलिसात दाखल झाले. अमोल यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. पोलिसात भरती होण्यापूर्वी अमोल त्याच्या मोठ्या भावासोबत नृत्य शो करायचे, जे नृत्यदिग्दर्शक आहेत.

मी लहान मुलांसोबत नृत्याचा आनंद लुटतो;

अमोल कांबळे म्हणाले की, "एक पोलीस असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याव्यतिरिक्त नागरिकांची सुरक्षा करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे, पण माझ्या साप्ताहिक सुट्टीत मी माझ्या मुलांसोबत, माझ्या बहिणीच्या मुलांसोबत मी नाचतो आणि मजा करतो.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT