Pune Drug Party Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Drug Party Case : पुण्यातील एल३ पब प्रकरणी मोठी कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक निलंबित

Pune Drugs Party News : पुणे ड्रग्ज प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुण्यातील एफसी रोड हॉटेल पार्टी प्रकरण त्यांना भोवलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुणे ड्रग्ज प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुण्यातील एफसी रोड हॉटेल पार्टी प्रकरण त्यांना भोवलं आहे. पुण्यातील एल3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता. मात्र तरीसुद्धा पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यापाराकरणी पुणे पोलिसांच्या आयुक्तांनी देखील कारवाई केली होती. त्या पाठोपाठ आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली आहे.

पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई

दरम्यान, पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत.

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

SCROLL FOR NEXT