Police Hawaldar From Pune Wrotes a Funny Leave Application Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : सुट्टीसाठी कायपण! हवालदाराने असं कारण सांगितलं की, अधिकारीही पडले बुचकळ्यात

Police Hawaldar From Pune Wrotes a Funny Leave Application : हे कारण वाचून सुट्टी मंजूर करावी की नाही याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: नोकरी करताना अनेकदा आपल्याला काही कारणात्सव सुट्टी (holiday) घ्यावी लागते. कधी गावी जाण्यासाठी, कधी तब्येत बिघडल्यावर तर कधी इतर कारणांसाठी आपण सुट्टी घेत असतो. ही सुट्टी घेण्यासाठी आपल्याला ऑफिसला सुट्टी घेण्याचं कारण द्यावं लागतं. त्यासाठी लिखीत अर्ज (leave application) किंवा मेल आपल्या वरिष्ठांना पाठवावा लागतो. त्यांना कारण पटलं कर ते कर्मचाऱ्याला रजा मंजूर करतात. त्यामुळे अनेकदा सुट्टी घेताना कर्मचारी गंभीर किंवा खोटं कारण देतात. मात्र पुण्यातला एक पोलीस कर्मचारी याला अपवाद आहे. एस. डी. शिंदे या पोलीस (Pune Police) हवालदाराला २ दिवसांची सुट्टी हवी होती, त्यासाठी त्यांनी तसा अर्जही वरिष्ठांना दिला आहे. मुख्य म्हणजे सुट्टी का हवी याचं त्यांनी अगदी खरंखुरं कारण दिलं आहे. मात्र हे कारण वाचून सुट्टी मंजूर करावी की नाही याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत. (Police Hawaldar From Pune Wrotes a Leave Application For Buy Fish From Solapur)

हे देखील पाहा -

यासाठी मागितली २ दिवसांची सुट्टी

पुण्यातील या एस. डी. शिंदे (Police Hawaldar S. D. Shinde) पोलीस कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी यासाठी हटके स्टाईलमध्ये आपल्या वरिष्ठांना पत्र लिहलं आहे. आपल्या पोलीस सहकाऱ्याला चिलापी आणि रव मासे (Fish) घेऊन यायचे कारण देत या पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहलं आहे. मासे आणायचे कारण देत २ दिवस सुट्ट्या द्या असं या पत्रात मजकूर नमूद करण्यात आलं आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) घडला आहे. त्यामुळे या पत्राची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने पत्रात नेमकं काय लिहीलं?

पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एस. डी. शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुट्टीचा अर्ज केला, त्यात लिहिलं की, उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की माझी साप्ताहीक सुट्टी दिनांक २२/०५/२०२२ रोजी असून माझे मुळ गावी मु पो याशी जि. सोलापुर येथून खडक पो स्टैचे माझे सहकारी यांचेसाठी चिलापी व रव मासे घेवून येणे असल्याने मला दिनांक २९/०५/२०२२ रोजीची साप्ताहीक सुट्टी जोडून दिनांक ३०/०५/२०२२ रोजीची एक दिवस किरकोळ रजा मुख्यालय सोडण्याचे परवानगीसह मिळण्यास विनंती आहे. असा अर्ज त्यांनी वरिष्ठांकडे केला आहे.

सुट्टीच्या अर्जाची सर्वत्र चर्चा

आपल्या पोलीस सहकाऱ्यासाठी चक्क सोलापूरहून चिलापी आणि रव मासे आणण्यासाठी रजा मागणाऱ्या या पोलीस हवालदाराच्या पत्राची सर्वत्र चर्चा होतेय. एवढ खरं आणि स्पष्ट कारण, तेही सुट्टीसाठीच्या अर्जात क्वचितच कर्मचारी देतात. अशा गंमतीशीर कारणासाठी आता त्या पोलीस हवालदाराला वरिष्ठांकडून रजा मंजूर होते का याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT