>> अभिजित देशमुख
Kalyan Crime News: कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूम मधून सकाळच्या सुमारास चार वर्षाच्या मुलाचं एका व्यक्तीने अपहरण केलं होतं. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास करत अवघा आठ तासात या मुलाचा शोध घेत, त्याच्या आई-वडिलांची भेट घडवून दिली. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारेला चार मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी त्याने या चिमुकल्याचा अपहरण केल्याचं तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता व त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे कामं करतात. दोन वर्षाची मुलगी कीर्ती व चार महिन्याचा अथर्व ही दोन मुलं आहे. आज सकाळी कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळताना सोडून ते साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले. (Latest Marathi News)
यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्या ठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व व त्यांच्यासोबत खेळत असलेले चारही मुली तिथे नव्हत्या.
करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र मुलगा आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आढळून आला. हा इसम नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता.
रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमावर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं व मुलाची सुटका केली. चौकशी दरम्यान या इसमाचे नाव कचरू वाघमारे असल्याचे समोर आलं. कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्याचं समोर आलंय..पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.