Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दहा जणांवर गुन्हा दाखल; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Kamshet Police News : संशयितांकडून गाड्या व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहे.

दिलीप कांबळे

Maval News :

मावळच्या कामशेत येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये रोख रकमेसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुमारे दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील खडकाळे येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काही जण जुगार अड्डा चालवत आहेत. हे बेकायदेशिररित्या सुरु आहे. त्यामुळे परिसरातील युवकांवर व नागरिकांवर वाईट परिणाम होत आहे अशी तक्रार पाेलिसांना प्राप्त झाली.

त्यावरून सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांच्या पथकाने खडकाळे मधील नाणे रेल्वे गेट जवळील खाजगी जागेवरील बंदीस्त खोलीमध्ये छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालविणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण दहा ताब्यात घेण्यात आले. (Maharashtra News) त्यांचेकडून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा अकरा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT