kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: आरोपी लघुशंकेच्या बहाण्याने शौचालयाला गेला अन् खिडकीतून पळाला; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Kalyan Crime News: आरोपीने शक्कल लढवत शौचालयाच्या खिडकीचे जाळ्या वाकवून पळ काढला. काही क्षणात बाहेर असलेल्या पोलिसाना संशय आला.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेला आरोपी लघुशंका आल्याच्या बहाणा करत पोलीस बंदोबस्तात पोलीस ठाण्यातील शौचालयात गेला. त्यामुळे पोलीस बाहेर वाट बघत होते. मात्र आरोपीने शक्कल लढवत शौचालयाच्या खिडकीचे जाळ्या वाकवून पळ काढला. काही क्षणात बाहेर असलेल्या पोलिसाना संशय आला. रेल्वे पोलिस तत्काळ माग काढत अवघ्या तासाभरात या आरोपीला पुन्हा बेड्या ठोकल्या.

युवराज सरतापे असे या चोरट्याने नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात या आधीदेखील रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे पोलिसांनी ३० मे रोजी युवराज सरतापे या सराईत चोरट्याला अटक केली होती. युवराज हा सराईत गुन्हेगार आहे. युवराजकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्याला चौकशीसाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. शुक्रवारी २ जून रोजी दुपारच्या सुमारास त्याने लघुशंका असल्याचा बहाणा केला. पोलीस कोठडीतून चौकशीसाठी गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाहेर काढले होते.

लोहमार्ग पोलीस ठाण्यातील शौचालयात पोलीस बंदोबस्तात नेले होते. त्यानंतर शौचालयाच्या बाहेर दोन रेल्वे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले. मात्र बराच वेळ झाला तरी आरोपी शौचालयाच्या बाहेर येत नाही म्हणून तैनात असलेल्या हवालदार जाधव, आणि पठाण यांनी शौचालयाच्या दरवाजावर टकटक केली.

मात्र, त्यांना आतून प्रतिसाद मिळाली नाही. त्याचवेळी त्यांनी शौचालयाच्या दरवाजा उघडा असता तो शौचालयाच्या पाठीमागील बाजूची लोखंडी जाळी काढल्याचे दिसले. त्याचबरोबर संरक्षित भिंतीवरील तार काढून आरोपी युवराजने भिंतीवरुन उडी मारून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला, त्याचा पाठलाग करत उल्हासनगर शहरातील त्याचे घर गाठले.

याचदरम्यान त्याने गल्ली बोळातून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचे अपयशी ठरला. अखेर पोलिसांनी अवघ्या तासाभरात त्याला उल्हासनगर येथील लालचक्की भागातील घरात जात असताना त्याला अटक केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT