Pune Katraj Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; देहविक्री करण्यास भाग पाडलं; पती-पत्नीविरोधात गुन्हा

Pune Crime News: वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका तरुणीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

Pune Latest Crime News Today

वडिलांच्या उपचारासाठी उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने एका तरुणीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी-पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आकाश सुरेश माने आणि पूनम आकाश माने, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित तरुणी पुण्यातील (Pune News) कात्रज परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीचे वयोवृद्ध वडील आजारी पडले होते.  

त्यांच्या उपचारासाठी तिने आरोपी पूनम आणि आकाश यांच्याकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला वेळेवर पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपी आकाशने तरुणीला धमकावणे सुरू केले.  (Latest Crime News)

इतकंच नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला. आरोपी आणि त्याची पत्नी इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी तरुणीवर दबाव आणून तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. तसेच तिच्याकडून पैसे देखील वसूल केले.

धक्क्दायक बाब म्हणजे, आरोपी हे स्वत: ग्राहकांचा शोध घेऊन तरुणीची देहविक्री करीत होते. ग्राहकांकडून येणारे पैसे ते जमा करीत होते. आरोपींचे कृत्य दिवसेंदिवस वाढ असल्याने पीडित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT