Pune Breaking News: महिलेला मारहाण आणि जळीतकांड घटनेनंतर पुण्यात खळबळ; २ दिवसांत ८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Pune Police Suspension: लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Pune Breaking News
Pune Breaking NewsSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune Crime News:

लोणीकंद येथील जळीतकांड आणि हडपसरमधील महिलेला मारहाण प्रकरण पुणे पोलिसांना चांगलंच भोवलं आहे. पुण्यामध्ये गेल्या २ दिवसांपासून पुणे शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत आहे. काल ५ आणि आज आणखी ३ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. गेल्या दोन दिवसांत एकूण ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Pune Breaking News
Crime News : पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकावर चाकू हल्ला, एकास अटक

लोणी कंद पोलीस ठाण्यातील कार्यरत असणारे अशोक घेगडे, कैलास उगडे आणि महेंद्र शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

जळीतकांड प्रकरण काय?

पुण्यात २ दिवसांपूर्वी एका तरुणाने पोलीस कारवाई करत नसल्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींवर गुन्हा दखल केला. तसचं लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूरी केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

महिलेला मारहाण प्रकरण काय?

हडपसर पोलीस ठाण्यात घरकाम करणाऱ्या एका महिलेला मारहाण झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांकडून ही मारहाण केल्याचं समोर आलं होतं. या सर्व घटनांमुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या घटनांमुळे पुण्यातील लोणीकंद, हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. लोणीकंद येथील झालेलं जळीतकांड आणि हडपसरमधील महिलेला मारहाण प्रकरण पोलिसांना भोवलं आहे. दोन्ही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

Pune Breaking News
Nagpur Crime: नागपूरची कायदा सुव्यवस्था धाब्यावर; भरदिवसा तडीपार आरोपीचा खून, १५ दिवसात हत्येची ९ वी घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com