Beed Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात टवाळखोरांची हिंमत वाढली; पोलिसांवर उचलला हात, गाडीची चावीही काढली, मग पोलिसांनी...

सदर घटना खडकी येथील त्यांगी शाळेसमोर सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसही गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पुण्यातील एका घटनेमुळे पोलिसांच्याच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण पुण्यात टवाळखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही टवाळखोर सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री स्पीकरवर गाणी लावून धिंगाणा घालत होते. पोलिसांना त्यांना हटकलं असता या टवाळखोरांनी पोलीस उपनिरीक्षकावर आणि चालकावर हात उगारुण धक्काबुक्की केली. यानंतर त्यांच्या जीपची चावी काढून घेत दमदाटी केली.

सदर घटना खडकी येथील त्यांगी शाळेसमोर सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुमित मिश्रा, रसेल ऍल्वीस जॉर्ज, वृषभ पिल्ले, निशांत गायकवाड आणि सिध्दार्थ लोहाण यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदगुडे हे रात्र गस्तीवर असताना आरोपी सार्वजनिक ठिकाणी स्पीकरवर गाणी लावून नाचत होते. यावेळी त्यांच्यामध्ये कोणते गाणे लावायचे यावरुन भांडण सुरु होतं. फिर्यादी अर्जुन यांनी स्पीकर बंद करायला सांगितल्यावर आरोपी त्यांच्या अगांवर धाऊन आले. यानंतर जीपचा चालक पोलीस शिपाई यांच्या गणवेशाची कॉलर पकडून धमकावू लागेल.

आम्ही कोण आहोत माहित आहे का? पोलीस असला तरी आमचे काही वाकडे करु शकणार नाही, अशी धमकी आरोपींना पोलिसांना दिली. यानंतर त्यांच्या जीपची चावी काढून घेतली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मगदुम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना

Bombay High Court: महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

SCROLL FOR NEXT