raigad news Saam Tv
मुंबई/पुणे

Raigad News : कोर्लाई ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळांना अटक; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ ?

Prashant Misal Arrested: आज दुपारी मिसाळ यांना अलिबाग न्यायालया समोर हजर केले जाणार आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावामधील ठाकरे कुटूंबीयांची मालमत्ता गेल्या काही वर्षांपासुन वादात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी संध्याकाळी कोर्लाई ग्राम पंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली. आज मिसाळ यांना अलिबाग न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Breaking Marathi News)

कोर्लाई गावातील ठाकरे कुटूंबीयांच्या या मोकळ्या जमिनीवर 19 बंगलो असल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी श्रीमती संगिता भांगरे यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तत्कालीन ग्रामसेवक विनोद मिंडे, श्रीमती देवंगणा वेटकोळी, श्रीमती वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ यांच्या विरोधात 14 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला.

ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंद वहीमध्ये बेकायदेशिर नोंदी घेवुन खोटे दस्तऐवज तयार केले व शासनाची फसवणुक केली अशा स्वरूपाचा हा गुन्हा असुन भारतीय दंड संहीता कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे हा गुन्हा नोंद आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे तत्कालीन मुरुड तालुकाध्यक्ष तथा तत्कालीन कोर्लाई ग्राम पंचायतीचे सदस्य प्रशांत मिसाळ यांना सोमवारी संध्याकाळी अटक झाली आहे.

आज दुपारी मिसाळ यांना अलिबाग न्यायालया समोर हजर केले जाणार आहे. मिसाळ यांच्या या अटकेनंतर उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अशी जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

Sindhudurg : कणकवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान हाणामारी! | VIDEO

Cough Remedies: सतत खोकल्याचा त्रास होत होतोय? 'या' सवयी लगेच सोडा!

SCROLL FOR NEXT