- सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai : मागील 28 वर्षांपासून नवी मुंबईतील (navi mumbai latest news) करावे येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य कारणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला (citizen) दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. नुरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)
सन 1995 ला आपल्या आई वडिलांसह चोरट्या मार्गाने बांगलादेश वरून भारतात आलेल्या नुरिया उर्फ गणा बाबुल पठाणचे बिंग फुटलेय. गेली 28 वर्ष हा नवी मुंबईतील करावे गावात वास्तव्यास आहे. सध्या मच्छि आणि भजी विक्रीचा व्यावसाय करुन उदरनिर्वाह करत होता.
नुरियाचे एकाशी भांडण झाले. त्याच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नुरियाचे बिंग फुटले. दहशतवाद विरोधी पथकाला नुरिया बद्दल गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली.
तो मूळ बांगलादेशचा नागरिक असून येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे नुरियाने भारतीय ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड देखील बनवले आहेत. नुरियाला पुढील तपासासाठी एनआरआय पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.
Edited By : Siddharth Latkar