Pune Porsche Car Accident Latest Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड रिपोर्ट बदलला; ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक

Pune Accident News : धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुणे अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दोघांना चिरडलं होतं. या अपघातात एका तरुणासह तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा हा दारू पिऊन कार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली.

ही बाब उघड होताच पुणे पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली. सध्या पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे हे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे एचओडी आहेत. तर डॉ. श्रीहरी हरलोर हे रुग्णालयाचे सीएमओ आहेत. एका धनाढ्य व्यक्तीच्या पुत्राला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी कसे प्रयत्न केले, हे आता उघड झालं आहे. आता या डॉक्टरांवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंसह 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल

Hartalika Vrat 2025: हरतालिकेची पूजा घरी कशी करायची? जाणून घ्या व्रताचे नियम

Guardian Minister : आताची सर्वात मोठी बातमी! सावकारेंचं डिमोशन, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले

Ladki Bahin Yojana: आता अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Kokan Railway : लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवाशांची झुंबड; रेल्वेत कोकणवासीयांचे हाल

SCROLL FOR NEXT