Sion Hospital: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर

Sion Hospital Car Accident CCTV: शुक्रवारी संध्याकाळी सायन हॉस्पिटलमधील गेट नंबर ७ समोरील ओपीडी इमारतीसमोर झोपलेल्या महिलेला कारने चिरडले होते. सायन हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख राजेश डेरे यांची कार या महिलेच्या अंगावरून गेली होती.
Sion Hospital: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर
Sion Hospital Car Accident CCTVSaam TV

सचिन गाड, मुंबई

सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओ समोर आला आहे. या अपघात प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरला पोलिसांनी अटक देखील केली होती. कोर्टाने डॉक्टरला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सायन हॉस्पिटलमधील गेट नंबर ७ समोरील ओपीडी इमारतीसमोर झोपलेल्या महिलेला कारने चिरडले होते. सायन हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख राजेश डेरे यांची कार या महिलेच्या अंगावरून गेली होती. या अपघातामध्ये रुबेदा शेख (६० वर्षे) ही महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला होता.

Sion Hospital: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर
Mumbai Accident News : शीव अपघात प्रकरण: वृद्ध महिलेला कारने चिरडणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने सुनावली शिक्षा

या अपघातानंतर सायन हॉस्पिटलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. जखमी महिला ओपीडी इमारतीच्या समोर बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याची हॉस्पिटलने पोलिसांना चुकीची माहिती दिली होती. तपासादरम्यान हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गाडीची धडक लागल्याने महिला जखमी झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना ही कार डॉ. राजेश डेरे यांची असल्याची माहिती समोर आली होती. अपघातानंतर डेरे यांनी तिली मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला होता.

Sion Hospital: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर
Mumbai Local Fatka Gang News : मुंबईतल्या फटका गॅंगने केलं आणखीन एकाचं आयुष्य उद्ध्वस्त! मोबाईलसाठी थेट जिवाशी खेळ..

या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर डेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर डॉक्टरला आज शिंदेवाडी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने डॉक्टरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर डेरे यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर कोर्टाने डॉक्टर डेरे यांना २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Sion Hospital: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या कारने महिलेला चिरडलं, अपघाताचा CCTV व्हिडीओ आला समोर
Pune Essay Competition: माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यात भव्य निबंध स्पर्धा, विषय, ठिकाण अन् नियम सर्वच हटके; अनोख्या निषेधाची राज्यात चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com