Mumbai Terror Attack Threat News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोटाची धमकी! फोन करणाऱ्या आरोपीला अटक; धक्कादायक कारण समोर

Mumbai Crime News: ओशिवरा पोलिसांनी आरोपीस उत्तर प्रदेश जोनपुर येथून अटक केली आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai News: मुंबई आणि पुणे (Mumbai- Pune Blast Threat) या दोन ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी संदेश देणाऱ्यास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आंबोली आणि ओशिवरा पोलिसांनी आरोपीस उत्तर प्रदेश जोनपुर येथून अटक केली आहे. दर्वेश शारदा राजभर उर्फ राहुल (२२ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० ते १०.२० वा. च्या दरम्यान एका मोबाईलवरून मुंबई येथे वेगवेगळ्या ठिकाणी व पुणे येथे बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याच्या धमकीचा एक फोन संदेश आला. ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. या मोबाईल क्रमांक विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तसेच दोन्ही शहरातील पोलिसांनी अलर्टही जारी केला आहे. ही धमकी देणाऱ्या आरोपीचा तपास ओशिवरा पोलिसांनी सुरू केल्यानंतर तो उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) जौनपुर येथे असल्याचे समजले. त्यानंतर सपोनि संदीप पाटील, सुनिल खैरे व पोह रघुनाथ बरगे असे पोलीस पथक रवाना करून आरोपीला जौनपुर, उत्तर प्रदेश येथून अटक केली. (Crime News)

दरम्यान, पोलिसांनी या फोन कॉल संदर्भात चौकशी केली असता आपली घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तात्काळ पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले आहे. तसेच ही कल्पना आरोपीला व्टिटर अकांउट वरील न्युज पाहत असताना सुचली असल्याचे सांगून त्याने न्युजवर देण्यात आलेला हेल्पलाईन नंबर वर धमकीचा संदेश पाठविल्याची कबुली दिली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT