CM Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग; तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार, मुंबईत काय घडलं?

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शुभम कुमार (वय ३०) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

Satish Daud

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शुभम कुमार (वय ३०) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आपण अभिनेता असल्याचं या तरुणाने पोलिसांना सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येत होता. वांद्रे वरळी सी लिंकवरून पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासाठी लेन ७ आणि ८ रिकामी करण्यात आली होती.

त्याचवेळी अचानक एक तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग सुरू केला. त्याने सातव्या लेनवर कार घातली. पोलिसांनी (Mumbai Police) या तरुणाला इशारा देत गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, तरी देखील तरुण सुसाट वेगाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत होता.

पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला थांबवलं. माझं नाव शुभम कुमार असून मी अभिनेता आहे, असं या तरुणाने पोलिसांना सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी शुभम याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

SCROLL FOR NEXT