Virar Poisoning case
Virar Poisoning case Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

मुंबई : विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणात पाल पडल्याने विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधा (Poisoning) झालेल्या पाच जणांपैकी दोन लहान मुलांचा मृत्यू झाला (two children died) असून तीन जणांवर महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आसिफ खान (५) आणि फरीन खान (७) अशी मृतांची नावं आहेत. तर फराना खान (१०), आरिफ खान (४), साहील खान (४) अशी रुग्णालयात दाखल झालेल्यांची नावं आहेत. दरम्यान, पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी जाऊन पंचनामा करत जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या घटनेची नोंद मांडवी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी परिसरातील कण्हेर येथील नालेश्वर नगर येथे राहणारे अशफाक खान रिक्षा चालक आहेत.त्यांना ५ मुले आहेत. शुक्रवारी रात्री ते रिक्षा चालवून घरी आल्यावर कुटुंबासह जेवण केलं. त्यानंतर रात्री अचानक त्यांच्या पाचही मुलांना पोटदुखीचा त्रास झाला. तसंच मुलांना उलट्यांचाही त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्नातून विषबाधा झाली असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत अशफाक खान आणि त्यांच्या पत्नीला कोणाताही त्रास झाला नाहीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

SCROLL FOR NEXT