Pune Mahanagarpalika  Saam Tv
मुंबई/पुणे

PMRDA: पुणे महानगरपालिका आता पेपरलेस होणार; घरबसल्या समजणार तुमच्या कामाचे स्टेटस

Pune Mahanagarpalika News: पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेचे आता सर्व काम पेपरलेस होणार आहे.

Siddhi Hande

पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे.

राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेची कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.पीएमआरडीएच्या हद्दीतील ९ तालुक्यांतील 817 गावांचा समावेश असणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये आता पेपरलेस काम होणार आहे.

काय काय सुविधा मिळणार?

स्वाक्षरीअभावी फाईल अथवा अर्ज रखडल्याचे स्टेटस समजणार

नागरिकांना घरबसल्या किंवा संस्थांना त्यांच्या कार्यालयातूनच ऑनलाइन कामकाज हाताळता येणार

बांधकाम परवानगी ते प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइन होणार

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याची सद्यःस्थिती पाहता येणार

पुणे महानगरपालिकेचा नवा उपक्रम

पुणे महानगरपालिकेने आता कर्मचाऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु केला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणाव दूर करण्यासाठी अॅप तयार केले आहे.महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मेंटल हेल्थ ॲपची खरेदी करण्यात आली आहे.पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य यसाह त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी या ॲप ची खरेदी केली आहे.सध्या या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार आहे.

यासाठी कंपन्यांनी दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. मेंटल हेल्थ ॲपच्या दोन हजार युनिटसाठी १ कोटी २७ लाख ४४ हजार रुपये खर्च येणार आहे.कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT