Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणेकरांसाठी खुशखबर! नूतन वर्षापासून पुण्यात 'डबल डेकर' बस धावण्याची शक्यता

पुणे शहरात नव्या वर्षापासून सार्वजनिक व्यवस्थेत बदल पाहायला मिळणार आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. पुणे शहरात नव्या वर्षापासून सार्वजनिक व्यवस्थेत बदल पाहायला मिळणार आहे. पुण्यात लवकरच 'डबल डेकर' बस धावण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) च्या ताफ्यात पुढील वर्षी 'डबल डेकर' बस येऊ शकतात. त्यामुळे पुणेकर लवकरच नूतन वर्षापासून 'डबल डेकर' बसचा प्रवास करण्याची शक्यता आहे. पीएमपीएलची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीबद्दल पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबद्दल माहिती दिली

'डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये 'डबल डेकर' बस धावत आहेत याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा (infrastructure) पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत', अशी माहिती ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.

'आम्ही मुंबईमधील बेस्टशी यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवड मध्ये किती यशस्वी होतील यासाठी एक अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतर या बद्दल ठोस निर्णय घेतला जाईल, अशी देखील माहिती ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली.

दरम्यान, पुणेकरांकडून अनेक दिवसांपासून बसमध्ये गर्दी होत असल्याची तक्रार होती. तसेच पुणेकरांना ट्रॅफिक जामचा देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुणेकरांकडून 'डबल डेकर' बसची मागणी होती. पुणेकरांच्या मागणीनंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने 'डबल डेकर' बस सेवा सुरू करण्याचा विचार केला आहे.

दरम्यान, ९० च्या दशकात पुणे महानगर परिवहन महामंडळाने 'डबल डेकर' बस सेवा सुरू केली होती. ही बस सेवा केवळ शिवाजी नगर आणि त्याच्या परिसरात होती. कारण अनेक कंपन्या त्या परिसरातच होत्या. त्यांनतर आता पुन्हा पुणे महानगर परिवहन महामंडळ 'डबल डेकर' बस सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results जुन्नर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार शरद सोनावने आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT