ramnath kovind visit to pune saam tv
मुंबई/पुणे

PMC News: राष्ट्रपतींच्या दाै-यामुळे पुण्यातील उद्याची पाणी कपात टळली

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुण्यात केले जाणार आहे.

Siddharth Latkar

पुणे : पुणे महापालिकेने (pmc) उद्या (गुरूवार, ता. २६ मे) सर्व नागरी भागातील प्रस्तावित पाणी पूरवठा कपात रद्द केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) हे पुणे (pune) शहर दाै-यावर येत असल्याने या आठवड्यातील पाणी (water) कपात रद्द केल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली. (ramnath kovind pune latest marathi news)

पंपींग स्टेशनमधील दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने उद्या (गुरुवार) शहरातील विविध भागात पाणी पूरवठा कपातीचा निर्णय घेतला हाेता. गुरुवार आणि शुक्रवार या दाेन दिवशी पुण्यातील विविध भागात पाणी पूरवठा हाेऊ शकणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले हाेते. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दाै-यामुळे तुर्तास हा पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने स्थगीत केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व विभागांची बैठक घेतली हाेती. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुणे शहरात असणार आहे. शुक्रवारी ते बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

Kitchen Hacks : भांडी धुतल्यानंतर ही भांड्यांना दुर्गंधी येते? मग हि सोपी ट्रिक करा फोलो

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT