PM Narendra Modi  Saam TV
मुंबई/पुणे

PM Narendra Modi Maharashtra Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कुणावर निशाणा साधणार?

PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता त्यांचा सोलापूरचा दौरा देखील ठरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात राज्यात मोदींचे सोलापूरनंतर आणखी तीन ते चार दौरे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

सुनील काळे, मुंबई

PM Narendra Modi News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारीला नवी मुंबईला 'अटल सेतू'सह विविध पायाभूत सुविधांचं उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता त्यांचा सोलापूरचा दौरा देखील ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच त्यांचे पुढील महिन्यात राज्यात आणखी तीन ते चार दौरे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकींच्या बैठकांचा सपाटा लावण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, कार्यकर्त्यांचा गाठीभेटी वाढल्या आहेत. तर काही राजकीय नेत्यांकडून लोकसभा जागा वाटपाचीही चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे वाढले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध पायाभूत सुविधांच्या उद्घाटनासाठी १२ जानेवारीला मुंबईला हजेरी लावली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुढील महिन्यात राज्यात तीन ते चार दौरे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोलापूरनंतर नरेंद्र मोदींचे सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रात दौरे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र यांच्या दौऱ्यात विविध विकासकामांचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यात दौरे वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा कसा असेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहे. मोदी यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता रे नगर परिसरात उभारलेल्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. मोदी यांचा हा दौरा ८५ मिनिटांचा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपन, मॉडेल हाऊसची पाहणी, विडी कामगारांशी संवाद तसेच रे नगर घरकुलांचे वाटप यांसारखे कार्यक्रम होणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणावर निशाणा साधणार, हे पाहावे लागेल.

मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

तत्पूर्वी, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेला 15000 घरे देण्यासाठी सोलापुरात येत आहेत. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी करण्यात आली होती, अ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर

Pune Accident: गणपतीच्या बुकिंगसाठी गेले असता भयंकर घडलं, ट्रकने ११ वर्षांच्या मुलीला चिरडलं; अपघाताचा थरारक VIDEO

Pune : पुण्यातील शाळेत अश्लील डान्स, अंगविक्षेप करत तरुणीनं लगावले ठुमके, Video Viral

Election Commission : आयोगाला पत्रकार परिषद भोवणार? व्होट चोरीचा मुद्दा महाभियोगापर्यंत जाणार?

Maharashtra Government: शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज: बळीराजासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT